Posts

Showing posts from November, 2010

"राष्ट्र आणि त्याच्या विकासासाठी आपले योगदान "

"राष्ट्र आणि त्याच्या विकासासाठी आपले योगदान " हा विषयच आता साहित्यातीलप्रवाहातूननाहिसा होताना दिसतोय.कदाचित माझी दृष्टी मोठी नसेल परंतू अलिकडे जर आपण लक्षपूर्वक पाहिले, तर कुठ्ल्याही साहित्य संमेलनातील वरिल विषयाचा साधा उल्लेखही कुठे होत नाही. काय हा परिसंवादाचा विषय होऊ शकत नाही? महाराष्ट्रातच विविध मतांचे सहित्य संमेलन होतात परंतू त्यात कुठेही राष्ट्रचा विकास व आपले योगदान, तो महासत्ता कसा होईल याविषयी का चर्चा केली जात नाही? संमेलनातून सामान्य व्यक्तिला देशाच्या विकासाबद्दल काही मार्गदर्शन मिळायला हवे. मला असे वाटते की इतर कुठल्याही विषयापेक्षा आज सर्वात जास्त आवश्यकता या विषयाची आहे.देशाची अंतर्गत सुरक्षा, आंतरराष्ट्रीय सीमांचे प्रश्न, अखंडता यावर मार्गदर्शन मिळायला हवे. सुशिक्षित,सुसंस्कृत, सारस्वतांची ती जबाबदारी आहे. ते त्यांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. काश्मिर भारतापासून वेगळॆ करण्याच्या एकमेव उद्देशाने काश्मिरातील फुटिरतावाद्यांनी देशाची राजधानी दिल्लीत "आझादी-द ओन्ली वे" या नावाने बिनबोभाट कार्यक्रम घेतला.अर्थात त्यांचा हेतू वेळीच ओळखून कश्मिरी पंडितांनी त्या…