Posts

Showing posts from June, 2011

शिक्षक या पदाचे वाढते अवमूल्यन

सृष्टीची निर्मिती झाल्यापासून संबंध मानवजातीत माणूसपण आणण्यासाठी,ज्ञान देऊन प्रगल्भ करण्यासाठी गुरु,शिक्षक हि संस्था ज्ञानदान करत आलेली होती.त्यासाठी आवश्यक अभ्यास,चिंतन करून इतरांना ज्ञान देण्यासाठी कष्ट करण्याची समर्पित वृत्ती असणारे ते एक चालते बोलते
विद्यापीठ होते.बोले तैसा चाले याचा एक आदर्श वस्तुपाठ होते.मानवाच्या प्रगतीसाठी संशोधन करून विविध शास्त्रांचा विकास व्हावा हा निर्मळ हेतू त्यामागे होता.नैतिक मुल्यांची जपणूक तर त्यांच्या जगण्याचे मुलभूत अधिष्ठान होते.त्यामुळे समाजातील नैतिक व सांस्कृतिक वातावरनाचे नेतृत्व शिक्षकांकडे होते.थोडक्यात काय तर त्यागी वृत्तीचा शिक्षक,प्राध्यापक हा सृजनशील समाज निर्मितीचा पाया होता. आता होता म्हणावे लागतेय हे आपल्या देशाचे सर्वात मोठे दुर्दैव आहे.हा वारसा साने गुरुजींपर्यंत पाळला गेला.पण नंतरच्या काळात मात्र या अभेद्य किल्ल्याचे बुरुज हळूहळू ढासळत गेले आणि सध्याच्या या शोर्टकर्टच्या जमान्यात तर शिक्षक,प्राध्यापक संस्थेचा पार धुव्वा उडाला आहे.हे चिंतन व्हायला कारणीभूत झाली ती गोंदिया जिल्ह्यातील धाबे पवनी येथील घटना.तेथे एका शिक्षकाने व्ययक्तिक वा…

मी लोकशाही बोलतेय

नमस्कार
अशक्त का असेना तुम्हाला बोलण्याइतपत माझ्यात शक्ती थोडी शिल्लक आहे.ज्या देशात माझा गौरव झाला,ज्या देशाचा मला अभिमान वाटायचा आणि त्याचा देशात माझ्याच रखवालदारांनी माझा गळा घोटण्याचे काम केले आहे अशी मी लोकशाही बोलतेय........
माझे वर्णन करताना असे म्हणतात कि,लोकांनी,लोकांच्यासाठी आणि लोकांकरिता अशी केली होती परंतु भ्रष्ट नेत्यांनी त्यात बदल केलाय"स्वत:,स्वत:चे खिसे भरण्यासाठी देशहिताला हरताळ फासून जमेल त्या मार्गाने पैसा मिळवायला कशाचीही भीती नसलेली व्यवस्था असे झाले आहे.लोकहो,या भ्रष्टाचाराने मला खिळखिळे करून टाकले आहे.माझ्या रखवालदाराच या भ्रष्टाचाराचे रक्षणकर्ते आहेत.कायद्यातील पळवाटा शोधून घटना व कायदे यांना हाताचे बाहुले करून टाकले आहे.देशाचे समाजाचे अपराधी आज उजळ माथ्याने फिरत आहेत.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या अपेक्षेने माझा स्वीकार केला गेला तो आज सपशेल धुळीस मिळाला आहे.माझे स्वप्न दिवास्वप्नच ठरले.आता या देशात माझा श्वास गुदमरतो आहे.सामान्य नागरिकाची वाताहत आता मला पाहवत नाही.त्याला स्वातंत्र्याचे फळही तर मिळाले नाही हालअपेष्टा काही कमी झाल्या नाहीत.शासनाने केल…

पैसा झाला खोटा

अस म्हणतात कि भारत देश गरीब आहे भारतीय नाहीत.कारण स्वीस बँकेत काळा पैसा जमा करणारे जास्तीत जास्त भारतीयच आहेत.देशात महागाई एखाद्या अजगरासारखी सामान्य नागरिकाला घट्ट आवळून बसली आहे.वारंवार प्रयत्न करूनही सरकारला त्यावर नियंत्रण आणता येत नाहीये.त्यातच भर म्हणून कि काय रोज नवीन घोटाळे उघडकीस येत आहेत.केंद्र सरकारला विकासाची पाउले उचलण्या ऐवजी बचावात्मक पवित्राच घ्यावा लागतोय.कॉंग्रेसच्या प्रवक्त्यांची पत्रकारांना उत्तरे देताना दमछाक होते आहे.लोकपाल विधेयक तर सरकारला डोकेदुखीच ठरत आहे.अगोदर अण्णा आता स्वामी रामदेव बाबा यांचे ४ जून पासून सुरु होणारे उपोषण.विदेशातील काळा पैसा भारतात आणावा हा स्वामी रामदेव यांचा प्रमुख मुद्दा आहे. विदेशातील काळा पैसा भारतात आणणे हे केंद्र सरकारसाठी आव्हान आहे आणि त्यामुळेच स्वामी रामदेव यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी सरकारमधील चार मंत्री त्यांना समजवण्यासाठी विमानतळावरच भेटले.पंतप्रधानांनाही विनंती करावी लागतेय.विदेशातील काळा पैसा भारतात आणणे खरेच एवढे कठीण आहे कि सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव आहे.विदेशातील काळ्या पैश्याची आकडेवारी पाहिली तर खरेच एवढा पैसा लपव…