Posts

Showing posts from January, 2012

गुरुजी मिळतील का ?

असे म्हणतात कि,शिक्षकाच्या एका पायात विकास तर दुसऱ्या पायात विनाश असतो.म्हणजेच एका शिक्षकाने ठरवले तर राष्ट्रनिर्माण होऊ शकते आणि शिक्षक बिघडला तर विनाश होण्यासही काही वेळ लागत नाही.सध्या तरी शिक्षक,प्राध्यापक वर्ग वेगाने आपला दुसरा पाय पुढे टाकत आहे.याचा दाखला देणारी घटना नुकतीच औरंगाबाद शहरात घडली.दोन शिक्षकात हाणामारी होऊन त्यात एका शिक्षकाचा मृत्यू झाला.हि एकच घटना नाही तर महाविद्यालय परिसरात मारहाण,प्राथमिक शाळेत लैंगिक शोषण अशा अनेक घटनांनी राज्यातील शिक्षण क्षेत्र हादरवून जात आहे.
समाज कुठल्या दिशेने जात आहे,हे कळण्यासाठी हि उदाहरणे पुरेशी आहेत.हि परिस्थिती बघून शिक्षकीपेशा हा व्यवसाय नसून एक व्रत आहे असे म्हणणे भाबडेपणाचेच ठरेल.कधीकाळी तो होता.साने गुरुजी आता फक्त जयंती,पुण्यतिथी पुरतेच उरलेत याचा हा सक्षम पुरावा आहे.डी.एड.होऊन संस्थाचालकाला लाखात पैसे देऊन शिक्षकाची नौकरी मिळाल्यावर याहून दुसरे होणार तरी काय?देशाच्या तसेच समाजाच्या जडण उभारणीत शिक्षकाचे योगदान किती अमूल्य आहे याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे.आणि तरीही शिक्षक निर्माण होण्याची प्रक्रियाच किती कुचकामी आहे हेच यानि…

बिन पैशाचा तमाशा

महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावर पक्षबदल काही नवीन नाही.हा बिन पैशाचा तमाशा हा महाराष्ट्र गेली कित्येक वर्षे पाहत आहे.आपली अडचण झाली म्हणजे पक्षापेक्षा स्वत:च्या मनाप्रमाणे झाले नाही कि घुसमट,अन्याय इ.शब्द वापरून पक्षबदल करायचा धंदा बिन बोभाटपणे चालू आहे.
राज्यात नुकतेच भाजपचे राष्ट्रीय नेते गोपीनाथ मुंडे यांच्या भावाने बंड केले.भाजपचे आ.प्रकाश शेंडगे पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत.रा.कौ.चे ठाण्यातील आमदार व नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.याला उत्तर म्हणून शरद पवार यांनी शिवसेनेचे ठाणे-कल्याण येथील खासदार आनंद परांजपे यांना शिवसेना पक्ष अडचणीचा असल्याची व तसेच राष्ट्रवादी पक्ष विकास करणारा असल्याची जाणीव करून दिली.त्यांनाही हि पटली.आणि मग पुन्हा तीच रटाळ भाषा"विठ्ठलाशी मतभेद नाहीत,बडव्यांचा त्रास आहे"मला यांना एक विचारावेसे वाटते कि,कुठलाही वारकरी बडव्यांचा त्रास होतो म्हणून वारी कधीतरी चुकवतो का?हि सगळी संधिसाधू वाक्य आहेत.यांचा विठ्ठल वगैरे काही नसतो.प्रश्न फक्त व्यावहारिक फायदा-तोट्याचाच असतो.फायदे-तोटे सगळेच बघतात पण ज्या कार्यकर्त्यांनी यांना निवडून येण्यासाठी रात्रंदिव…

वैचारिक दरिद्र्यरेषा

दरिद्ररेशा आत फक्त आर्थिकच नसून वैचारिक पण असू शकते हे आता ठळकपने जाणवू लागले आहे.आन्ना हजारेंच्या लोकपाल आन्दोलनाबाबत तर या दरिद्र्यरेश्याची यादीच स्पष्ट झाली.पुढील मुद्दे वाचून आपल्याही हे लक्षात येइलच....लोकशाही धोक्यात आल्याचा कांगावा लोकपाल आला म्हणजे जणू कही हिटलरच येणार आणि समस्त कोंग्रेस वासिय ज्यू लोकांची सरसकट हत्या करणार असाच कांगावा केला जात आहे.लोकपाल सारखी यंत्रणा भ्रष्टाचाराची स्वतंत्र चौकशी करणार आहे.सध्याच्या सी.बी.आय किंवा अन्य तपास यंत्रणा या सत्ताधारी पक्षाच्या प्रतिनिधिचेच काम करतात.आपल्याकडे खरा प्रश्न आहे तो राजकीय हस्त्क्षेपाचा.खरे तर राजकीय हस्तक्षेप हे वरदान ठरावे आपल्याकडे मात्र तो शापच ठरतोय.लोकपाल ला जर सक्षम करायचे असेल तर त्याला राजकीय हस्त्क्षेपापासून दूर ठेवन्यासाठी त्याचे स्वतंत्र अस्तित्व करावेच लागेल.आता प्रश्न हा उरतो की लोकपालच भ्रष्टाचारी निघाला तर काय करायचे?तर ज्याप्रमाणे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायामुर्तिना संसदेत महाभियोगाद्वारे पदच्युत करता येते त्याप्रमाणे लोकपाल लाही करता येऊ शकेल.आणि शंकाच घ्यायची ठरवली तर कुठल्याही पदावरील व्यक्तीला १…