Posts

Showing posts from June, 2012

शहाणपण देगा देवा

अस म्हणतात कि, शहाणपण हे आयुष्यातील वेगवेगळ्या अनुभवावरून येते. अनुभवातून बरे-वाईटातील फरक लक्षात येतो व त्यातूनच माणूस शहाणपणाचे निर्णय घेतो. पण जेव्हा वारंवार अनुभव शिकवत असताना त्याकडे दुर्लक्ष करून नेहमी अपयश पदरी पाडून घेणे नक्कीच शहाणपणाचे असणार नाही. यातील दुसरी बाजू अशी कि यातून संशयाचा धूर निघू लागतो. कारण जी गोष्ट सामान्य माणसाला कळते ती राज्याचे नेतृत्व करणार्यांना का कळणार नाही. निष्कर्ष असा निघू शकतो कि जेव्हा वैयक्तिक हितसंबध गुंतले असतात तेव्हाच अश्या घटना घडतात. निमित्त आहे मंत्रालयास लागलेल्या आगीचे, आदर्श प्रकरण, अबू हमजा (जिंदाल) ची अटक या घटनांचे
मंत्रालयास नव्हे तर सरकारच्या विश्वासार्हतेलाच आग राज्याची सर्वात महत्वाच्या इमारतीस मंत्रालयास आटोक्यात न आंत येणारी आग लागते अन त्यात ५ निरपराध व्यक्तींना जीव गमवावा लागतो. तब्बल २००० संगणक जळून खाक होतात. नंतर कळते कि इमारतीचे Safety Audit झालेच नव्हते. त्याहून वाईट घटना म्हणजे उपमुख्यमंत्री म्हणतात कि " माझेच कॅबीन कसे काय जळाले मुख्यमंत्र्यांच्या केबिन मधील कागदालाही धक्का नाही. " हा काय प्रकार आहे ? राज्याच्य…