Posts

Showing posts from October, 2012

दुर्दशेचे बाप ब्रह्मचारी

"बाळाचे बाप ब्रह्मचारी"नावाचा एक मराठी चित्रपट आहे.वास्तविक या वाक्यातील परिस्थिती शब्दश:शक्य नाही कारण बाळाचा बाप ब्रह्मचारी कसा असू शकेल?पण देशात भ्रष्ट नेत्यांनी जे दुर्दशा नावाचे अपत्य जन्माला घातले आहे त्याचे पितृत्व नाकारत आम्ही तर ब्रह्मचारी आहोत असेच अगदी ठामपणे सांगत आहेत.आपला दिवस सुरु होतो घोटाळ्याच्या बातम्यांनी आणि संपतो तो वाढलेल्या महागाईच्या बातम्यांनी.यात थोडे समाधान असे कि,अलीकडे काही नेते प्रामाणिकता जपत आहेत म्हणून ते जाहीरपणे सांगतात कि"घोटाळे लोक विसरून जातील" , "लग्न जुने झाल्यावर मजा नाही", "अराजक माजलेल्या देशातील मांगो आम आदमी".चुकून का होईना त्यांचा आतला आवाज(या आवाजाला त्यांच्या पक्षात मोठेच वजन)बाहेर आला असो.वाईट या गोष्टीचे वाटते कि,जबाबदार व्यक्तींना अत्यंत बेजबाबदारपणे वागताना त्यांना काहीच वाटत नाही.म्हणून अनकेदा त्यांच्या हेतूवर शंका येणे गैर का मानावे?सिंचन घोटाळा उघड करणाऱ्या अभियंता पांढरे यांना सरळ वेडे ठरवले जाते.रोबर्ट वढेरा यांचे गैरव्यवहार उघड करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना संविधान विरोधी ठरवले जाते.याचा…