Posts

Showing posts from January, 2013

राजकीय इच्छाशक्तीतून मनुष्यनिर्मानाच्या व्यवस्थेकडे

प्रत्येक देश,प्रत्येक समाज अहोरात्र एकाच गोष्टीचा घंटानाद करत असतो किंवा टाहो तर नक्कीच फोडत असतो ती म्हणजे विकास.विकास हा एकच असा मुद्दा असावा कि तो कायम चर्चेत आहे मग ते गावातली चावडी अहो किंवा देशाची संसद.देशातील सर्व तज्ञ मंडळी या एकाच उद्दिष्टाकडे मार्गक्रमण करण्याची धडपड करत आहे.मग एवढी चर्चा होऊनही आजपर्यंत आपण समाधान मानावे अश्या परिस्थितीपर्यंत का नाही पोहोचलो?मानव विकास निर्देशांक वगैरे लांब राहिले आपण साध्या रस्ते,वीज आणि पाणी या मुलभूत गरजापण पुरवू शकत नसू तर नक्किच संकट गंभीर आहे.यादीच करायची ठरवली तर एक प्रबंध होईल पण त्याने मुलभूत प्रश्न दूर होणार नाही.जर इतिहासात डोकावल्यास तर असे लक्ष्यात येईल कि प्रत्येक बदलाचे,विकासाचे जे मुख्य सूत्रधार होते त्यांच्यात विकासाची प्रचंड व प्रामाणिक इच्छाशक्ती होती ती आजची राज्यकर्त्यांमध्ये अजिबात दिसत नाही.याला कारण कदाचित आपली मनुष्यानिर्मानाची व्यवस्था असेल.आपण राष्ट्रीयत्व,देशाभिमान,वैयक्तिक चरित्र,समर्पण हि मुल्ये प्रत्येक भारतीया मध्ये रुजविण्यात अपयशी ठरलो आहोत असेच म्हणावेसे वाटते.याचा पुरावा म्हणजे येथील आजचे भयाण वास्तव आहे. …