Posts

Showing posts from October, 2013

स्वामी विवेकानंद : स्फूर्तीदायी स्मरण

Image
प्रत्येक जण धावत असतो.पैसा, मान सन्मान, सत्ता, प्रसिद्धी मिळवल्यानंतरहि कशाची तरी कमतरता जाणवते.कारण जायचे कुठे आहे? आणि ते ध्येय स्वत:स निश्चितपणे जाणून, तपासून घेतले आहे का ?अशा प्रश्नांची उत्तरे नकारार्थीच येण्याची शक्यता आहे. हि कमतरता नेमकी काय आहे हे कळण्यासाठी किंवा मानवजन्माची सार्थकता कशात आहे हे समजण्यासाठी स्वामीजींचे स्मरण आवश्यक ठरते. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात दिव्यता येण्यासाठी कार्यरत असले पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक असणारी प्रेरणा, स्फूर्ती स्वामी विवेकानंदांच्या चरित्रातून निर्माण होऊ शकते. विवेकानंदांच्या चरित्रातील सर्वात प्रेरक आहे ते त्यांचे सत्यशोधनासाठी असलेले प्रामाणिक प्रयत्न, त्याच्यासाठी आवश्यक त्याग , तळमळ,समर्पण आणि एकदा ते सापडल्यावर आपल्यासारखा लाभ इतरांनाही व्हावा हि इच्छा. स्वामीजींनी कोणतेही तत्व, प्रमाण स्वीकारताना ते बौद्धिक पातळीवर घासून पडताळून घेतले. विवेकवादाची हि खरी साधना म्हणावयास हवी. सध्याच्या काळात अनेकजण 'विचारवंत' या उपाधीला प्राप्त करून घेण्यासाठी बिनदिक्कतपणे तत्व, विचार नाकारतात. तत्व खरे कि खोटे याचा प्रामाणिक सत्यशोधनात हि मं…