Posts

Showing posts from December, 2013

मर्यादा आपच्या

Image
दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम  पक्षाने अनपेक्षितरीत्या जोरदार मुसंडी मारत आपले अस्तित्व सिद्ध केले. नेहमीप्रमाणेच याहीवेळी आप पार्टीला मिळालेल्या यशाने अनेकजण हुरळून गेले आहेत आणि इतकेच नव्हे तर राजकारणातून जवळपास निवृत्त झालेल्यांना खुर्ची दिसू लागली आहे. परंतु जे दिल्लीत घडले ते इतर ठिकाणी शक्य आहे का ? मुळात दिल्ली मध्येच ते का घडले या प्रश्नाची उत्तरे शोधल्यास हेच जाणवेल कि आप पक्षाला राष्ट्रीय पक्ष बनून संपूर्ण देशात विस्तारायचे असल्यास अजून खूप लांब पल्ला गाठायचा आहे. दिल्लीतील यश अरविंद केजरीवाल यांचे सर्वात महत्वाचे बलस्थान म्हणजे त्यांची जी ओळख सर्वाना झाली ती अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून. जनमाणसात त्यांची स्वच्छ आणि सामान्य अशी प्रतिमा निर्मिती या आंदोलनाच्या माध्यमातून झाली. व त्यांनी सामान्य व्यक्तींच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून केलेला प्रचार. त्यांच्या जाहीरनाम्यात व्यवहारीकतेपेक्षा भावनिक आश्वासनाचा भर सामान्य मतदारांना भुलवून गेला. मतदारांच्या द्र्ष्टीने सुविधा मिळणार हि भावना महत्वाची ते निर्माण कशी होणार याच्या भानगडी…