Posts

Showing posts from February, 2014

देव पाहायासी गेलो

Image
मानव विचार करू शकतो त्याच्यात जिज्ञासा, चिकित्सक वृत्ती आहे, बरे-वाईट ठरवण्याची,निवडण्याची आणि त्याप्रमाणे आचरण करण्याची क्षमता आहे. आणि याच्याही पुढे जाउन असे म्हणता येईल की, मनुष्यत्वाचा संपूर्ण विकास करण्याची अफाट शक्यता आहे. स्वत:ला पूर्णपणे जाणून घेण्याच्या या प्रवासात,या प्रयत्नात आपले मानवजन्माचे अंतिम उद्दिष्ट्य असले पाहिजे. यामुळेच आपल्या शास्त्र ग्रंथाची ची सुरुवात कोहम ? म्हणजेच मी कोण आहे ? या प्रश्नाने होते. आणि ही शोधयात्रा ‘सोहम’ म्हणजेच तो मीच आहे . या उत्तराच्या केवळ माहित करून घेण्याने नव्हे तर अनुभव करून घेण्याने संपते. आपली वैचारिक,तात्विक अथवा प्रत्यक्ष जगण्यातील समृद्धी या शोधयात्रेतील वेगवेगळ्या प्रयत्नातून आलेली दिसते. वेगवेगळी मते,त्यांची वेगवेगळ्या पध्दतीने केलेली मांडणी व तसेच विरोधी मत त्याचे तात्विक खंडण करून स्वत:च्या नव्या अनुभवाने केलेली पुनर्मांडणी आपली ऐतिहासिक बौद्धिक परंपरा आहे. अनेक आचार्यांनी मांडलेले सिद्धांत,तत्वे मार्ग हे सर्व या कोहम ते सोहम या शोधायात्रेचाच अभिन्न भाग म्हणावे लागतील. थोडक्यात काय तर सगुण देव, निर्गुण ब्रह्म यांचा शोध घेण्याचे…

लिमीटेड प्रेम

Image
प्रेम असाव दिव्यासारख स्वत: जळून इतराना प्रकाश देणार कसलीही अपेक्षा न करता आपल्यासाठी राबनारया आईच्या मायेसारख

आकर्षण हेच प्रेम समजणा-या व टाईम पास म्हणून एका दिवसापुरता साजरा करणा-या प्रेमवीरांचा दिवस शुक्रवारी आहे. सध्याचा काळ नौटंकी करणाऱ्यांचा असल्याने प्रेमासारख्या उत्कट भावनाही फेशनच्या बाजारात कवडीमोल ठरत आहे.आपले जगणे कृत्रिम होत जात असल्याचे हे महत्वाचे निदर्शक आहे. नेहमी इतरांचे बघून त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना नैसर्गिक आनंद शोधणे व जगणे निरर्थक वाटत आहे. मला खरेच आनंद मिळतो की. इतरांना दाखावाण्यासाठी,प्रतिष्ठा जपण्यासाठी मी हे करत आहे असा विचार फारसा कोणी करत असल्याचे दिसत नाही. अन्यथा न शोभणारे फेशन त्यांनी स्वीकारले नसते. असाच एक फेशन म्हणजे व्हेलेनटाईन डे. प्रेम म्हणजे त्याग, समर्पण असे म्हणणे म्हणजे धाडसाचे ठरावे. हे निरीक्षण बहुतांश युवक वर्गासंदर्भात आहे.जे  १४ फेब्रुवारी ला प्रेम दिवस साजरा करतात त्यांच्याबाबतीत तरी किमान हे खरे असावे.         बॉलीवूड मधील नायक-नायिका प्रेमाचा अभिनय करतात ते चित्रपटात, परंतु त्यापासून प्रेरणा घेऊन आजचे प्रेमवीर प्रत्यक्ष ज…