Posts

Showing posts from March, 2014

खुश तो वो लोग थे जो खुशिया बाट रहे थे ।

आयुष्यात गरिबी सारखा मोठा शिकवणी वर्ग कोणताच नाही. गरिबी म्हणजे आळस  नक्कीच नाही. पैशाअभावी शिक्षण नाही अन शिक्षण नाही म्हणून   पैसा नाही. अशी अनेक उदाहरणे आपल्याला बघायला मिळतात. आपण अशाही परिस्थितीत संकटांचा सामना करत हसतमुखाने वर्तमानाला सामोरे जाणारे परिवर्तन घडवतात. आणि अशा गरिबीच्या शिकवनीतुन शिकलेला विद्यार्थी प्रगल्भ,संवेदनशील  होतो. ज्याची आज समाजाला खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. अर्थात श्रीमंत माणसे प्रगल्भ नसतात किंवा असंवेदनशील असतात असे  नाही.  तर गरिबी ही समोरच्याचे दुख अनुभवायला लवकर मदत करते. इतरांच्या दुखाची तीव्रता लगेच जाणवते. 
मला आठवतात गल्लीतील एक काकु. एक मुलगी व दोन मुले असणार्या या काकू शेतमजुरी करून घर चालवण्यास मदत करायच्या. पतीचे दारूचे व्यसन घरात पैसा टिकू देत नव्हते. अनेकवेळा पतीचा मारही खायच्या. वैतागून शिव्याही  द्यायच्या पण प्रेमही तेवढेच करायच्या. आपल्या पती कडून कसल्याही प्रकारचे सुख न मिळताही, पदोपदी अपमान सहन करून त्याच्यावर केवळ नवरा म्हणून आपला मानण्यात कसले  आलेय प्रेम ? पण भारतिय स्त्री हे एक अजब रसायन आहे. सहनशीलता तिला वारसा हक्काने मिळाली आहे.…