खुश तो वो लोग थे जो खुशिया बाट रहे थे । - दर्पण

Thursday, March 27, 2014

खुश तो वो लोग थे जो खुशिया बाट रहे थे ।आयुष्यात गरिबी सारखा मोठा शिकवणी वर्ग कोणताच नाही. गरिबी म्हणजे आळस  नक्कीच नाही. पैशाअभावी शिक्षण नाही अन शिक्षण नाही म्हणून   पैसा नाही. अशी अनेक उदाहरणे आपल्याला बघायला मिळतात. आपण अशाही परिस्थितीत संकटांचा सामना करत हसतमुखाने वर्तमानाला सामोरे जाणारे परिवर्तन घडवतात. आणि अशा गरिबीच्या शिकवनीतुन शिकलेला विद्यार्थी प्रगल्भ,संवेदनशील  होतो. ज्याची आज समाजाला खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. अर्थात श्रीमंत माणसे प्रगल्भ नसतात किंवा असंवेदनशील असतात असे  नाही.  तर गरिबी ही समोरच्याचे दुख अनुभवायला लवकर मदत करते. इतरांच्या दुखाची तीव्रता लगेच जाणवते. 

मला आठवतात गल्लीतील एक काकु. एक मुलगी व दोन मुले असणार्या या काकू शेतमजुरी करून घर चालवण्यास मदत करायच्या. पतीचे दारूचे व्यसन घरात पैसा टिकू देत नव्हते. अनेकवेळा पतीचा मारही खायच्या. वैतागून शिव्याही  द्यायच्या पण प्रेमही तेवढेच करायच्या. आपल्या पती कडून कसल्याही प्रकारचे सुख न मिळताही, पदोपदी अपमान सहन करून त्याच्यावर केवळ नवरा म्हणून आपला मानण्यात कसले  आलेय प्रेम ? पण भारतिय स्त्री हे एक अजब रसायन आहे. सहनशीलता तिला वारसा हक्काने मिळाली आहे. ' कवातरी चांगल व्हईल ' हे यांचे जीवनसूत्र.  अशाही परीस्थितीत मुलीला शिकवत होत्या. अपमान हे गरिबीचा अंगभूत गुण. त्यामुळे गरज असली की त्याच्यात अपमानाचे  आपोआप पचन  होते. गरिबीला दवाखानाही बहुतेक वेळा अपरिचितच दुखणे अंगावर काढणे हा तर अलिखित नियमच. पोट हातावर असल्याने दुखणे कळू न देता मेहनत करत राहायची आणि तेही चेहरयावर आठ्या न पडू देता. उपाशी राहणे तर अंगवळणी पडलेले. त्यामुळे गल्लीतील एखाद्या आजीने 'भाकर खाल्ली का ?  ' असे विचारले की सगळा थकवा एका क्षणात संपून जातो. या तीन शब्दाने सकाळी पाच वाजता उठून पाणी भरण्याची ताकद सहज निर्माण होते. असे जगणे गरीबीच शिकवते.  
सगळा आटापिटा लेकरांसाठी. जगण्याची ही दररोजची लढाई लढत असताना देवाला, नियातीबद्दल कुठेही तक्रार नाही. 'तो सगळ बरोबर करील' या श्रद्धेत कुठेही कृत्रिमता नाही. 
काही दिवसांपूर्वी हिंदीतील प्रसिद्ध कवी अशोक चक्रधर यांच्या फेसबुक वोल वरचा एक स्टेटस हृदया पिळवटून टाकणारा होता. 
'मैने रीक्षेवालेसे पुछा भाई पैर को क्या हुआ, जखम बडी दिखा रही है । उसने बोला 'भाई साहब ' रिक्षा पैर से नही, पेट से चलता  है। ' 

हे लिखाण गरीबीचे समर्थन अथवा उदातीकरण करणारे अजिबात नाही. तर श्रमाची किमत झाली पाहिजे  हे सांगण्याचा प्रयत्न आहे. इतरांच्या दुखासाठी आपल्या हृदयात  थोडी जागा निर्माण व्हावी यासाठी आहे. फार नाही किमान त्यांचाशी थोडे आपुलकीने बोलले तरी त्याना जग जिंकल्यासारखे  वाटते. त्याना हा आनंद आपण एक पैसा न खर्च करता देऊ शकतो.   इतरांकडून फसवणूक, अल्प मोबदल्यात खूप श्रम करण्याचा अनुभव घेऊन आपल्यातील प्रामानिकपनाची ज्योत कायम तेवत ठेवण्यारया श्रमिकाना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी हा खटाटोप. मग जगणे काय आहे ? आनद कशात आहे ?  पुढील ओळीत याचे उत्तर नक्के सापडेल. 
खुशिया बटोरते बटोरते उमर गुजर गई पर खुष ना हो सके  
एक दिन अहसास हुआ 
खुश तो वो लोग थे जो खुशिया बाट रहे थे ।

कोणाच्या आहेत माहित नाही. पण त्याना खूप धन्यवाद.

No comments: