Posts

Showing posts from April, 2014

नेतृत्वासाठी तहानलेला मराठवाडा

विकास प्रक्रियेत अथवा कुठल्याही चांगल्या बदलाच्या मुळाशी प्रयत्नातील सातत्य आणि ते करणारे नेतृत्व या दोन प्रमुख बाबी कारणीभूत असतात. विकासाचे केंद्र राजकीय इच्छाशक्ती असते हे आपण इतर अनेक उदाहरणावरून बघू शकतो. मराठवाड्याच्या संदर्भात कदाचित या दोन बाबी समांतर चालल्याचे दुर्दैवाने कधी दिसले नाही. म्हणजे  या मातीतील नेतृत्वाने देशाचे नेतृत्व केले .तरीही त्या नेतृत्वाचा फायदा मराठवाड्याच्या मुलभूत विकासात भर पडण्यात विशेष उल्लेख करावा असा झाला नाही. झालाच असेल तरतो फक्त त्यांच्या मतदार संघापुरता. परंतु मराठवाड्याचे  म्हणून असे प्रभावी नेतृत्व अजूनही उदयास आलेच नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागते. काही महिन्यांपूर्वी मराठवाडा जनता विकास परिषदेने नांदेड येथे मराठवाड्याच्या पाणी प्रश्न व अन्य समस्यासंदर्भात विधिमंडळात ‘आवाज ‘ उठवण्यासाठी मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक   आयोजित केली होती. निमंत्रित एकूण  ४८ पैकी केवळ १३ लोकप्रतिनिधी बैठकीला हजर होते.मराठवाड्याची आज दशा आहे याचे कारण अन्यत्र शोधण्याची आता गरजच नाही. अजूनही मराठवाड्याच्या नशिबी समस्या का आहेत याचे उत्तर मात्र यानिमित्तान…

प्रयत्न उमेद जागवण्यासाठी

Image
हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने गलितगात्र झालेले गावातील शेतकरी आम्हाला गारपिटीने झालेल्या नुकसानीची माहिती देत होते. इतक्यात तेथे एक टेम्पो येऊन थांबला आणि एक शेतकरी काहीशा घाईत निघू लागले. आम्ही त्याना विचारले तर त्यांचे उत्तर गारपिटीने झालेल्या नुकसानीची भीषणता स्पष्ट करणारे होते. त्यांनी सांगितले “गारपिटीने सगळा माल नष्ट केला. आम्ही कसेही जगू . बैलांना काय खायला घालू. चारा मिळणे शक्य नाही म्हणून दीड लाखाची बैल जोडी एका लाखात विकतोय.अजून उशीर झाला तर आणखीन नुकसान सहन करावे लागेल. ” जालना जिल्ह्यातील हा एक प्रसंग खूप काही सांगून जातो. दि. ३ मार्च पासून ते १५ मार्च २०१४ पर्यंत विविध ठिकाणी  गारपीट झालेली दिसली. गारपिटग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुंबई येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने १३,१४,१५ व १६ मार्च या कालावधीत ‘दिलासा प्रकल्प’ राबवण्यात आला. यात राज्यातील विविध भागात पथके पाठवली गेली. या पथकांनी एकूण १७ जिल्ह्यातील ३६ तालुकांतर्गत ८४ गावांना भेटी दिल्या. या भेटीदरम्यान नुकसानीचे नेमके चित्र स्पष्ट होण्यासाठी शेतकऱ्यांना काही प्रश्न विचारण…