Posts

Showing posts from June, 2014

सदरक्षणाय की खलरक्षणाय ?

Image
पोलीस प्रशासन हा शासन व्यवस्थेचा कणा समजला जातो. एकवेळ प्रशासकीय व्यवस्था विस्कळीत असेल तर त्याच्या जो काही अनुचित परिणाम समाजावरती होईल त्याच्या दुपटीने जास्त वाईट परिणाम पोलीस यंत्रणा कुचकामी ठरल्यास होऊ शकतो. कारण समाजातील प्रत्येक व्यक्ती निर्भय असतात व गुन्हेगारांना ज्यांची धास्ती असते असे ज्यांचे अस्तित्व आहे त्या पोलीस यंत्रणेला राजकीय व्यक्तींनी स्वत:च्या फायद्यासाठी पोखरून टाकले आहे. ही वस्तुस्थिती अनेक घटनांवरून सहज लक्षात येण्यासारखी आहे. दिल्ली येथे रामदेव बाबा यांच्या आंदोलनावेळी रात्रीच्या वेळी झोपलेल्या व्यक्तीवरचा अमानुष हल्ला असो अथवा मावळ येथील पोलीसानाकडून झालेला गोळीबार असो अशा अनेक घटनांची मालिका देशातील/राज्यातील जनतेने अनुभवली आहे. याच मालिकेतील ताजा प्रसंग म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील कनगरा या गावातील नागरिकाना पोलिसांकडून रात्रीच्या वेळी झोडपले गेले. हे नागरीक ना आंदोलन करत होते ना कोणा राजकीय नेत्याच्या विरोधात गेले होते. त्यांच्या दोष एवढाच होता की त्याना गावातील दारूचे बंद करायचे होते. हे प्रकरण गंभीर आहे ते या कारणामुळे. दारू विक्रेत्याला राजकीय नेत्यांचे…