Posts

Showing posts from July, 2014

वास्तवातील ' हीरो'

मुंबईतील लोटस बिझनेस पार्क या इमारतीला लागलेली आग विझवताना अग्निशमन दलाचे जवान नितीन इवलेकर हे शहीद झाले.अशा घटनांमधून आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भातील दोष प्रकर्षाने सामोरे येतात. त्यातही आपत्तीपूर्व दक्षता घेण्याबद्दल आपण अक्षम्य दुर्लक्ष करतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्यानंतर, ती कोसळल्यानंतर सुरक्षेचे परीक्षण केलेच नसल्याचे पुढे येते. परिणामी नितीन यांच्या सारख्या जवानांना आपला जीव गमवावा लागतो. भूतकाळातील कोणत्याही दुर्घटनेपासून धडा न घेतल्याने व्यवस्थेतील दोष आहे तसेच आहेत व याचे अजून किती बळी जाणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. या दुर्घटनेनंतर नितीन यांच्या कुटुंबियाना शासना तर्फे मदत जाहीर केली गेली, परंतु शासकीय दिरंगाई चे ग्रहण अशा अतिसंवेदनशील घटनांमध्येही दुर्दैवाने लागलेलेच आहे. देशासाठी,समाजासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारया शहीद कुटुंबियांची अवस्था काही प्रमाणात अशीच आहे. मुख्य प्रश्न म्हणजे शासकीय स्तरावर  कोणालाही खेद ना खंत. अशा परिस्थितीत चित्रपट अभिनेते राकेश रोशन यांनी तत्परतेने या कुटुंबाला १५ लाख रुपयाची  मदत केली. चित्रपट उद्य…

ध्यास नवनिर्मितीचा

सृष्टीमध्ये अस्तित्वात असलेल्या प्रत्येक प्राणीमात्रामध्ये नवनिर्मिती हा एक समान गुणधर्म आढळतो. नवनिर्माणाकडे असलेली  ओढ याची साक्ष देते. जगण्याचा लढा  देत, अनंत अडचणींचा सामना करत जगणे फ़ुलवणे ही नवनिर्मितीची अविकसित शक्तीच होय. अर्थात  केवळ जगणे म्हणजेच काही नवनिर्मिती नव्हे, तर आपल्या अस्तित्वाला एक वेगळा अर्थ निर्माण करणे. स्वत :च्या कोशात न रमता इतरांच्या आयुष्यातील दुख वेदना कमी करण्यासाठी निमित्त होणे. ज्यांनी अशाप्रकारे आपल्या  नवनिर्मिती च्या शक्तीचा म्हणजेच सृजन शक्तीचा विकास केला आहे त्यांची आयुष्य इतरांसाठी आधार ठरली, सामान्यांच्या जगण्याला  कलाटणी देणारी ठरली किंबहुना ठरत आहेत. आपल्या भोवतीच्या प्रचंड नकारात्मक वातावरणात त्यांनी  सकारात्मक बदल घडवले. दुर्दम्य आशावाद, प्रबळ इच्छाशक्ती व प्रयत्नातील सातत्य ही या सृजन शक्तीची बलस्थाने. या तीनही गुणांचा समुच्चय एकाच ठिकाणी दुर्मिळ्तेने पाहायला मिळतो. म्हणजे समाजात चांगल्या घटना घडाव्या असे सगळ्यानांच वाटते, परंतु त्यासाठी फार थोडे लोक प्रयत्न करतात. एखाद्याने प्रयत्न करण्यास सुरुवात केली तरी मार्गातील अडथळ्याना तोंड देत प्रयत्…

प्रवाह चैतन्याचा..

Image
महाराष्ट्र हा शब्द उच्चारला, की डोळ्यांसमोर गणेशोत्सव व पंढरपूरच्या वारीचे चित्र उभे राहते. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या लोकजीवनाचे अभिन्न अंग आहे व त्याचे मुख्य सूत्र वारी हे आहे.   सीगल या समुद्रपक्ष्याची कथा आपल्यापैकी  बहुतेकांना ज्ञात असेल. हा समुद्रपक्षी केवळ अन्नाच्या शोधार्थ न भटकता उंच भरारी घेण्याची कला अत्यंत कष्टाने शिकतो व त्या अगम्य प्रदेशात विहार करतो; परंतु इतर समुद्रपक्ष्यांना ही कला यावी याकरता तो परत आपल्या मूळ ठिकाणी येतो व त्यांना ही कला शिकवू लागतो. अर्थातच, त्याला त्याला प्रवाहाच्या विरुद्ध जावे लागते; परंतु अत्यंत निष्ठेने तो हे काम करत राहतो. वारकरी संप्रदायात  होऊन गेलेले संत हे खर्‍या अर्थाने सीगलच आहेत. ज्यांनी यातना सहन करून सामान्य जनांच्या जीवनात दिव्यत्व येण्यासाठी आयुष्य वेचले. या संतांनी वारकरी संप्रदायाची निर्मिती करून एका विलक्षण जगाची ओळख त्यांना करून दिली व प्रपंचात राहून आयुष्याचे र्मम समजून घेण्यासाठी  जीवन जगण्याची कला शिकवली.       व्यक्तीचे आयुष्य समाधानी-सुखी होण्यासाठी ते प्रवाही असले पाहिजे; परंतु आपल्या सुखाच्या- समाधानाच्या संकल्पना…

ही जबाबदारी सर्वांचीच

जबाबदारी सर्वांचीच जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही असणारया आपल्या देशाच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका नुकत्याच पार पडल्या. त्या जशा राजकीय नेत्यांच्या शिवराळ,अर्वाच्य भाषेने गाजल्या तितक्याच त्या मतदारयादी संदर्भात झालेल्या घोळानेही चर्चेचा विषय झाल्या. निवडणूक आयोगाने  अधिक  लोकाभिमुख  आवश्यक आहे. तसेच वापरण्यात येणारे तंत्रज्ञान हे युजर फ्रेंडली असले पाहिजे. अन्यथा आहे ती पध्दत अधिक क्लिष्ट होण्याचा धोका आहे. या सर्व प्रक्रियेत निवडणूक आयोगाच्या वर्तमान कार्यपध्दतीच्या मर्यादा या निमित्ताने स्पष्ट झाल्या. निवडणुक आयोगाच्या नेतृत्वाने परिस्थितीचे हे त्रांगडे सोडवण्याची धमक दाखवावयास हवी.यासाठी आवश्यकता आहे ती प्रखर इच्छाशक्तीची.        अमलबजावनीचा अभाव हे आपल्या देशासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. सामान्य नागरिकाला या समस्येचा सामना करणे हे दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहे. परंतु पाच वर्षानी एकदाच होणारया निवडणुकीच्या याद्या सुद्धा अद्ययावत नसणे हे निश्चितच लाजिरवाणे आहे. निवडणूक आयोगासारख्या संवैधानिक दर्जा असणाऱ्या संस्थानी साकल्याने नियोजन करणे अपेक्षित आहे.
बी.एल.ओ. ची भूमिका
न…