Posts

Showing posts from August, 2014

श्रीगणेशाचे कार्यकर्त्याना पत्र

Image
श्रीगणेशाचे कार्यकर्त्याना पत्र
प्रतिवर्षी  माझ्या आगमनाची आतुरतेने प्रतीक्षा करणारया तमाम कार्यकर्त्यानो …।
अत्यंत आपुलकीने दरवर्षी तुम्ही चातकाप्रमाणे माझ्या आगमनाची प्रतिक्षा करता. उत्साहात स्वागत करता. लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला दिलेले सार्वजनिक स्वरूप मलाही अत्यंत भावले. तुमच्या हृदयात तर मला कायमचे स्थान आहे, परंतु या दहा दिवसांच्या काळात मला तुम्हा कार्यकर्त्यांचे सुख, दु: ख जाणून घेता येते. पूजा- अर्चना करताना तुमचा भाव बघून मी भारावून जातो. यामुळेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुमचा निरोप घेताना माझेही डोळे पाणावतात.त्या सोनेरी दिवसांच्या आठवणीनेआजही माझे मन आनंदाच्या जलधारेत ओलेचिंब होते. त्या वेळी या उत्सवात युवकांना राष्ट्र प्रेमाचे धडे दिले जात. वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमामधून नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात होते. वैचारिक मंथन होऊन नवनव्या विषयांवर प्रबोधन व्हायचे, उत्साहाला दिशा मिळे.  यामुळे  वातावरणा तील कण- न- कण अपूर्व उत्साहाने भरून जात.  तुम्हा कार्यकर्त्यात एक वेगळेच आत्मीय अनुबंध निर्माण व्हायचे. आरतीच्या निमित्ताने परिसरात…