Posts

Showing posts from October, 2014

शुभ संकल्पांचा उत्सव

Image
भारतीय संस्कृती वैभवशाली होण्यात सन उत्सवांचा मोठा वाटा आहे. उत्सवाच्या निमित्ताने मानवाचे  केवळ मानवाशीच नव्हे तर निसर्ग, प्राणी या सर्व घटकांशी आपले भावनिक नाते  दृढ करता येतात. नात्यांना  उजाळा मिळतो. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात विविध समस्यांना तोंड  लागते. गरजा पुर्ण करण्याच्या धडपडीत  अनेकवेळा आयुष्य हे एखाद्या मशीन सारखे यांत्रिक होते. यामुळे अर्थातच रोजच्या जगण्यातील आनंद संपून गेल्याने जगणे कंटाळवाणे वाटू लागते. शिणलेल्या अशा जीवाला उत्सवांच्या माध्यमातून नवी उर्जा मिळते. पदोपदी होत असलेला अपेक्षाभंग, स्वप्नांच्या साकारता येत नसल्याने होणारी घुसमट क्षणभर विसरली जाते. दीपावली असाच एक चैतन्याचा उत्सव आहे. सर्वत्र पसरलेला अंधकार दूर करणारा  हा  उत्सव आहे. आयुष्यात विविध स्वरूपात असलेला ठाण मांडून बसलेला हा अंधकार व्यक्तीला त्रस्त करतो. विसंवाद हे या अंधकाराचेच एक स्वरूप. आपले सहकारी,आप्तेष्ट  यांच्याशी विविध कारणांनी विसंवाद निर्माण होतो. स्वाभिमान व दुराभिमान यातील रेषा स्पष्टपणे न उमजल्याने विसंवादाची ठिणगी पडते. अनेकवेळा क्षुल्लक कारण विसंवादाच्या मुळाशी असते…

लोकशाहीच्या नावान चांगभल

१५ तारखेला राज्यातील जनतेने आपला मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही शासन व्यवस्थेतील मतदार या घटकाला एक दिवसापुरते का असेना पण मोठेच महत्व असते.  निवडणुकीत नवीन  होते ते उरलीसुरली राजकीय संस्कृती अखेरचा श्वास घेताना बघण्याचे दुर्दैव. या निवडणुकीत किमान सभ्यतेच्या सर्वच मर्यादा  मोडल्या गेल्या. विशेषकरून बोलण्याच्या बाबतीत. निवडणुकीच्या प्रचारात आरोप -प्रत्यारोप हे होतच असतात. हे मान्य केले तरी ज्या काही संवेदनशील बाबी आहेत त्यांच्यासंदर्भात बोलताना तरी  किमान काही संकेत पाळले जावेत.परंतु या निवडणुकीत वाचाळवीरांचे वाकयुध्द असे पेटले होते की जणू काही सर्व सभ्यतेचे नियम तोडण्याचा चंगच त्यांनी बांधला होता. एरवी अशा विषयांवर लिहिण्याची आवश्यकता नव्हती परंतु बलात्कारासारख्या अतिसंवेदनशील विषयावर एका माजी मंत्र्याने केलेले वक्तव्य फारच दुर्दैवी आहे. असे अकलेचे तारे तोडणारे नेते आपल्याकडे घाउक प्रमाणात आहेत. हा प्रश्न  कोणा एका नेत्याच्या अथवा पक्षाच्या बाबतीत नसून एकूणच महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृती चे धिंडवडे निघण्याच्या बाबतीत आहे. नेत्यांना भाषणे करताना अशा प्रकारची बेताल वक्तव्ये करताना काह…

पोलीस राष्ट्रसाधनेचा कुपोषित साधक

निवडणुका, सार्वजनिक उत्सव, सभा, संमेलने, आंदोलन या सर्व सामाजिक घडामोडींचा पोलीस कर्मचारी हा साक्षीदार असतो. ज्यांच्या अस्तित्वाने आपण सार्वजनिक ठिकाणी व आपल्या घरातही निर्धास्त होतो ती व्यक्ती म्हणजे पोलीस. ज्यामुळे आपल्याला स्वातंत्र्याचा उपभोग घेता येतो. गुन्हेगारास कायद्याच्या धाक निर्माण करणारा पोलीस म्हणजे लोकशाही मूल्ये जपणारा जागता प्रहरी. सर्वसामान्यांचे जगणे सुलभ व्हावे यासाठी स्वत: कष्टमय जीवन जगणारा पोलीस हा सामाजिक आरोग्याचा वैद्यच; परंतु या वैद्याला आता विविध व्याधींनी जखडले आहे. ज्याचा प्रतिकूल परिणाम सार्वजनिक आरोग्यावर होत आहे. पोलीस शिपाई हा पोलीस प्रशासनाचा घटक जनतेशी सर्वात जास्त संपर्कात असतो. एका अर्थाने सामान्य जनता व कायदा-सुव्यवस्था यांना जोडणारा हा महत्त्वाचा दुवाच आहे. आपले कर्तव्य पार पाडत असताना त्याला व्यक्तिगत आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या प्रसंगाशी मुकावे लागते. पोलीस शिपायाची दिनचर्या पाहिली तर याची प्रचिती यावी. देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा कणा असणारा हा घटक प्रभावहीन होत चालला आहे. प्रशासकीय अधिकारी, पत्रकार व सामान्य जनता अशा जवळपास सर्वच समाजघटकाच्या …