Posts

Showing posts from November, 2014

सावर रे मना.....

जगण्याचा आनंद घेण्यासाठी ज्याप्रमाणे निरोगी शरीर आवश्यक आहे त्याचप्रमाणे मन ही निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे. मनाचे अंतरंग जाणणे अथवा त्याचा थांग लागणे हे  निश्चितच सोपे काम नाही. परंतु एक मात्र नक्की की, व्यक्तीच्या दैनदिन आचरणात मनाच्या  व्यवहाराचे निरीक्षण केले तर असे जाणवेल की आपल्याला अस्वस्थ करणा-या अनेक मानसिक त्रासाचे कारण आपल्या मनाच्या गाभा-यात दडलेले आहे, परंतु  ते निरोगी राहावे यासाठी आपण फारच थोडे प्रयत्न करतो. मनाचा व्यवहार सुरळीत चालावा यासाठी  संत साहित्यात सविस्तर संशोधन-चर्चा करण्यात आली आहे. विशेषकरून आध्यात्मिक प्रगती साठी मनाच्या अनियंत्रित व्यवहारावर अंकुश निर्माण करण्याकरीता प्रयत्न केले जातात. चंचलता,अस्थिरता हा मनाचा नैसर्गिक स्वभावच आहे,परंतु प्रयत्नांनी त्याची चंचलता नियंत्रित होऊ शकते. भूतकाळातील  त्रासदायक अनुभवांचा शोक अनावर झाला की मन तिथेच गुंतून जाते, परंतु यामुळे वर्तमानात भान हरपलेला व्यक्ती एकाग्रतेने आपले काम करू शकत नाही परिणामी जगण्याचा कंटाळा येतो, किंवा भविष्यकाळातील चिंतेने मनाचा ताबा घेतला की सदैव भीती वाटत राहते. या व अशा अनेक मानसिक समस्या …

अधर्माचा धार्मिक देखावा

Image
अनादिकाळापासून मानवसमुह धर्मभावनेशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने जोडला गेलेला आहे. समाजमनावर धर्मसत्तेचा मोठा प्रभाव होता किबहुना आजही आहे. नैतिक -अनैतिक संकल्पना, सृष्टीची  उत्पत्ती, कार्यकारण भाव, कर्म त्याचा परिणाम या सर्वांची चर्चा,ज्ञान तत्वांच्या द्वारे धर्माच्या माध्यमातून समाजमनावर मांडली जाते.व्यक्तीची जाणीव विस्तारली जावी, त्याला आपल्या अस्तित्वाचे कारण उमजावे व जीवनध्येय साध्य करण्याचा मार्ग सापडला जावा ज्यामुळे त्याचे आचरण आदर्श होऊ शकेल याकरिता धर्माचे निमित्त आहे. साधारणपणे असे म्हणता येईल की, धर्म म्हणजे आदर्श आचारसंहिता अथवा अशी तत्वे ज्यामध्ये सर्व जीवांचे कल्याण सामावले आहे. परंतु भारतीय समाजमनावर प्रबळ असलेल्या धार्मिक भावनेचा अनेक जण दुरुपयोग करताना दिसत आहेत. सध्या हरियाणातील रामपाल ही  व्यक्ती चर्चेत आहे. आपल्याला अटक होऊ नये यासाठी आपल्या शस्त्रधारी समर्थकांच्या गराड्यात सुरक्षित राहणारा संत असूच शकत नाहीत. हा रामपाल स्वत:ला कबीरांचा अनुयायी म्हणवतो. वास्तविक ज्याने कबीरांच्या दोह्यांचे किमान एकदा जरी वाचन केले असेल त्याला रामपाल या व्यक्तीचे थोतांड लगेच कळून …

विद्यापीठीय बंदीशाळा

भारताला ज्या काही मोजक्या बाबींमुळे संपूर्ण जगात सन्मान मिळतो, त्यातील प्रामुख्याने उल्लेख करावा असे तक्षशिला व नालंदा येथील विद्यापीठे आहेत. ज्या ठिकाणी विद्यार्थ्याना तत्वज्ञान, कला, विद्या यांचे शिक्षण मिळण्याची सुविधा होती. मोठ्या प्रमाणावर ग्रंथसंपदा होती. येथील आचार्य हे महान तत्वज्ञ व तसेच प्रकांडपंडित होते. एका अर्थाने विद्यार्थ्याचे जीवन घडविणारी ही संस्कारपीठे होती. भारताच्या महान ज्ञान-विज्ञान परंपरेचा वारसा ज्यांनी  चालवला अशी व्यक्तिमत्वे इथे घडत होती. एकूणच भारताच्या सांस्कृतिक परंपरेची आधारशीला म्हणता येईल अशी ही स्थाने होती. हा इतिहास आठवण्याचे कारण असे की, नुकतेच उत्तर प्रदेशातील अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या कुलगुरुनी फारच गमतीशीर विधान केले. त्यांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थीनी  वाचनालयात गेल्या तर तेथे विद्यार्थ्यांची संख्या वाढते. असल्या वाक्याने अपेक्षेप्रमाणे व्हायचा तो गोंधळ झाल्यानंतर स्पष्टीकरण  देताना असे सांगण्यात आले की, जागेच्या अभावी असे वाक्य बोलले गेले. अर्थातच जेवढे हास्यास्पद वाक्य त्यापेक्षा त्याचे स्पष्टीकरण होते. आपल्या देशात अनेक ठिकाणी प्रचंड विरोध…

प्रेम नावाची समृध्द अडगळ

‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ या ओळीतून प्रेम या व्यापक संकल्पनेची, पवित्र भावनेची व एका हळुवार नात्याची खोली स्पष्ट होते. प्रेम म्हणजे निरपेक्ष देणे. हे नाते बांधिलकी, विश्वासावर वर टिकते. प्रेमाचे नाते निर्माण झाल्यावर तेथे हव्यास नसतो तर समर्पण असते. जगण्याचे क्षण हे यज्ञातील समिधेसमान असते. प्रेमाचे नाते म्हणजे जगण्यातील खरे मर्म समजते. एखाद्या व्यक्तीविषयी, तत्वाविषयी अथवा देशाविषयी प्रेम निर्माण झाल्यावर एक भावानिक बंध निर्माण होतात, बंधने नाही. प्रेम म्हणजे आपल्या प्रेमास्पदाविषयीचा नितांत आदर सहजपणे निर्माण होतो. परंतु दुर्दैवाने प्रेमाच्या व्याख्या काळानुरूप बदलल्या गेल्या आहेत. सध्याचे प्रेम म्हणजे केवळ शरीर सुखापुरतेच संकुचित झाले आहे. त्यातून मग एकतर्फी प्रेम व त्यामुळे तरुणींवर होणारे अत्याचार या बाबी अत्यंत दुर्दैवी आहेत. जन्मोंजन्मी साथ देण्याची शपथा घेणारे प्रेमवीर सध्या  ब्रेक अप, लिव्ह इन यांसारख्या शब्दात अधिक रमले आहेत. मृगजळासमान क्षणिक आकर्षणाकडे बेधुंद होऊन धावत जातात सिमकार्डसारखे बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड बदलले जातात. यात खरे प्रेम कमी व देखावा जास्त असल…

प्रतिक्षा सुराज्याची...

प्रतीक्षा सुराज्याची...
कुरतडून गेलेली अर्थव्यवस्था,शेतक-यांच्या आत्महत्या, कायदा व सु-व्यवस्थेचे वारंवार निर्माण होणारे प्रश्न,धोरणांची अनागोंदी या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राज्यात नवे सरकार सत्तारूढ झाले. नवे सरकार आल्याने साहजिकच परिस्थिती बदलेल अशी सार्वत्रिक अपेक्षा आहे.अर्थात जादूची छडी कोणाकडेच नसल्याने लगेचच मोठे बदल होतील अशी भाबडी आशा नाही,परंतु तरीही कार्यपध्दती व दिशा याबाबतीत स्पष्टता असणे अत्यंत आवश्यक आहे. याचे कारण असे की,मागील शासनकाळात विविध पातळ्यांवर नेमकी दिशा-ध्येय धोरणे स्पष्ट नसल्याने कार्यपध्दती बाबतची चर्चा निरर्थक ठरते. या दिशाहीनतेची पुनरावृत्ती टाळली गेली पाहिजे. भारतीय जनता पक्षाने विकास व सुशासन या प्रमुख दोन मुद्द्यावर निवडणूक प्रचार केंद्रित केला होता. विकास व सुशासन या संकल्पनेवर आधारित गुजरात राज्याची नेहमीच चर्चा होत राहिली आहे. तेव्हा महाराष्ट्राला विकास व सुशासनाच्या ध्येयापर्यंत नेण्यासाठी राज्य शासन राबवणार असणा-या धोरणांचे स्वरूप कसे असेल ? त्यांची अंमलबजावणी कशी होणार आहे? याबाबतीत जनतेशी चर्चा-संवाद होणे गरजेचे आहे. पारदर्शकता हे सुशासनाचे मुलभू…

ग्रामोदयाचा प्रारंभ

सध्याच्या व्यवस्थेत लोकप्रतिनिधी हेच विकासाचे प्रमुख सूत्रधार आहेत.म्हणजे लोकहिताचे एखादे कार्य कोणी सामाजिक कार्यकर्त्याने हाती घेतले तर त्याला त्याच्या कार्यात यश मिळवण्यासाठी मोठा लढा द्यावा लागतो, परंतु तेच कार्य एखाद्या लोकप्रतिनिधी अथवा राजकीय नेत्याने हाती घेतले तर लोकभावना लगेच तयार होते व सर्व यंत्रणा कामाला लागते हे आपण पाहत आलो आहोत. थोडक्यात असे म्हणता येईल की लोकभावना ही नेत्यांच्या आश्रयाला असल्याचे चित्र आजवर होते म्हणून कदाचित यामुळे नेत्यांना लोकहिताची कामे करण्यात फार काही स्वारस्य नव्हते. परंतु या निवडणुकीने हे सर्व जुने समज मोडीत काढले. राज्यात जवळपास बहुतेक ठिकाणी परंपरेने निवडणूक जिंकत असलेले नेते पराभूत झाले. यापुढे कोणीही नेता असो, लोकहिताचे कामे केल्याशिवाय जनता स्वीकारणार नाही हाच मतितार्थ निवडणूक निकालावरून निघतो. आजपर्यंत लोकप्रतिनिधीना विकास हा शब्द पाठ होता, मात्र तो करायचा कसा याविषयी निश्चित कार्यक्रम नव्हता अथवा असला तरी अंमलबजावणी नव्हती. नुकतेच पंतप्रधानांनी खासदारांसाठी आदर्श ग्राम योजना जाहीर केली. ज्यामध्ये प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघातील ग…