Posts

Showing posts from December, 2014

रत्नांची आरास

नुकताच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व काशी येथील बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक मदनमोहन मालवीय यांना भारतरत्न जाहीर झाला. त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव झाला. यानिमित्ताने पुरस्कार व यासंदर्भात समाजाच्या मानसिकतेबद्दल वैचारिक मंथन सुरु झाले.         आपल्या कार्याचे कुणीतरी कौतुक करावे ही भावना असणे अगदीच नैसर्गिक आहे. कौतुक झाले  तर कार्य करण्यासाठी एक वेगळीच उर्जा मिळते. समाजाकडून आपल्या कार्याची दाखल घेऊन त्यावर व्यक्त केलेली कृतज्ञताच त्या पुरस्कारात असते. पुरस्काराची, कौतुकाची आवश्यकता निसंशय असतेच. मात्र पुरस्कारामध्ये अडकून पडल्यास अथवा या टप्प्याला कृतार्थता समजण्यात आली तर केलेल्या कार्याचे मुल्य कमी होऊ शकते. अथवा असेही म्हणता येईल की, पुरस्कार मिळवण्याच्या अपेक्षेने केलेले कार्य समाजात मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणू शकत नाही. आजही समाजात असे अनेक कर्मयोगी आहेत की ज्यांनी आपल्या कर्मयोगाला जीवनध्येय बनवले. हे कर्मयोगी एखाद्याच्या निंदेने थांबले नाहीत अथवा स्तुतीने हुरळून गेले नाहीत. ‘पुरस्कार, सामाजिक सन्मान हे कर्मयोगाच्या मार्गावरचे क्षणभर विसावे आहेत ’ अशी स्वत:ची मजब…

इथे ओशाळला मृत्यु

मागील आठवडयात तालिबानी नरपिशाच्चानी पेशावर मधील निरपराध विद्यार्थ्यांच्या हत्याकांडामुळे संपूर्ण जग हादरले. मृत्युनेही क्षणभर ओशाळावे अशा या घटनेचा   सर्व स्तरातून कठोर शब्दात निषेध व्यक्त केला गेला. भारतात सर्व शाळांमधून श्रद्धांजली अर्पण केली गेली. यासारखीच एक घटना ऑस्ट्रेलिया मध्ये घडली. काही दहशतवाद्यांनी एका कफे मध्ये नागरिकांना बंधक बनवले होते.सिरीया मध्येही घुसफुस चालूच आहे.एकूणच जगभरात सर्वत्र दहशतवाद्यांनी थैमान माजवले आहे. बाकीच्या देशांच्या तुलनेत पाकिस्तान मधील घटना अत्यंत क्रूर होती. परंतु यातूनही पाकिस्तान सरकार काही धडा घेईल असे वाटत नाही. मुळातच पाकिस्तानमध्ये शासन व प्रशासनाचे काय हाल आहेत हे सर्व जगाला ठावूक आहे. लष्करशहा कोणत्या क्षणी पंतप्रधानाना पाय उतार करेल याचा अंदाज खुद्द पंतप्रधानांनाही नसेल. पाकिस्तान चा इतिहास याची साक्ष देतो आहे. तसेच इस्लामी धार्मिक मुलतत्ववादी लोक हा तेथील सर्वात प्रभावी  दबावगट आहे. त्यांचा शासन, प्रशासन व लष्कर यांच्यावर असलेला पगडा हा तेथील सामाजिक सामंजस्याला सर्वात मोठा धोका ठरत आहे. याचा परिपाक म्हणून तालिबान सारखे नरपिशाच्च तेथे स…

नतदृष्टांचे रडगाणे

‘घर की मुर्गी दाल बराबर’ अशी एक म्हण प्रचलित आहे. एखादे ऐतिहासिक महत्व असलेले साहित्य, स्थान आपल्या जवळ असेल तर  तर त्याचे महत्व आपल्या दृष्टीने अडगळीचेच असते. विशेषकरून व्यक्तींच्या बाबतीत तर तो व्यक्ती आपल्यातून निघून गेल्याशिवाय त्याचे मुल्य कळतच नाही. त्यानंतर त्या व्यक्तीचे पुतळे उभे करण्यात मात्र आपल्याला प्रचंड उत्साह असतो. अनेकवेळा तर महत्व कळूनही जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले जाते. जेव्हा त्या व्यक्ती, साहित्य, स्थाने यांचे श्रेष्ठत्व विदेशात मान्य केले जाते तेव्हा आपण त्याच्या श्रेष्ठत्वाला मान्यता देतो किंबहुना त्यांच्या श्रेष्ठत्वाबद्दल आतापर्यंत असलेली आपली हरकत मागे घेतो. अशा ही नतदृष्टपणाची कीड  भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात सुध्दा प्रभावी होती. तत्कालीन पुढारी इंग्रजाची मर्जी सांभाळण्यासाठी स्वदेश, स्वसंस्कृती, स्वदेशाभिमान, येथील सामान्य जनता यांची जमेल त्या वेळेस मानहानी करायचे. असल्या नतदृष्टांनी तात्कालिक फायद्यासाठी स्वत:च्या बुद्धीला गहाण ठेवून राष्ट्रभावनेचे अतोनात नुकसान केले.दुर्दैवाने अशांची वंशावळ आजही आपल्या पूर्वजांचा वारसा चालवत आहे. रवीन्द्रनाथानी अ…