Posts

Showing posts from January, 2015

स्वातंत्र्याची जबाबदारी

Image
अपरिपक्व अवस्थेत फार मोठी जबाबदारी मिळाली की त्यातून फार काही विधायक,आदर्श वर्तन घडताना दिसत नाही. आपल्या देशातील नागरिकांचे एकूण वर्तन व राष्ट्रीय चरित्र पाहिले की याची प्रकर्षाने जाणीव होते. भारताच्या स्वातंत्र्याचेही असेच झाले आहेत. स्वातंत्र्याचे मोल समजले नाहीकी,बेजबाबदारपणाचे वारू चौफेर उधळू लागतात. स्वातंत्र्याला विवेकाचे अधिष्ठान नसेल तर त्याचे रुपांतर विकृती मध्ये होते. अशा अविवेकी स्वातंत्र्याने समाजाचे मोठेच नुकसान होत आले आहे आणि सध्याही होत आहे. घटनेने प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य प्रदान केले आहे, हे मान्य केले तरी बेभान होऊन व्यक्तीस्वातंत्र्य प्रदर्शित करण्याने समाजहिताचे वाटोळे करण्यात कोणता शहाणपणा आहे?      वास्तविक स्वातंत्र्यासोबत एक जबाबदारी पण येते.सामाजिक भान येते. आम्ही वाट्टेल ते,आम्हाला आवडेल त्या पध्दतीने करू शकतो आम्हाला कोणीच अडवू शकत नाही कारण आम्ही स्वतंत्र आहोत’.असला माज स्वातंत्र्याचे अपचन झालेल्या व्यक्तींच्याच ओठी असू शकतो. स्वातंत्र्याचे असे अपचन होणे समाजहितासाठी निसंशय हानिकारक आहे.
खरा प्रश्न आहे तो प्रगल्भ नागरिकत्वाचा. व्यक्तिगत बाबी सार्वजनिक …

सामाजिक बदलासाठी युवामित्र

लोककल्याणाच्या हेतूने शासनस्तरावर होणारे निर्णय व योजना यांचे अमलबजावनीच्या पातळीवरील अपयश हे एकूणच सुशासनाच्या मार्गातील मोठाच अडसर आहे. स्थानिक पातळीवर अमलबजावनी प्रभावीपणे होत नाही याचे कारण लाभार्थ्यांना योजनांची,निर्णयाची तपशीलवार माहिती नसणे हे आहे. हीच परिस्थिती युवकांच्या बाबतीतही आहे. केंद्रीय युवक कल्याण मंत्रालय व राज्य शासनाच्या खात्यामार्फत युवकांसाठी विविध योजना राबवल्या जातात.युवकांना स्वयंरोजगारासाठी सहाय्य व अन्य प्रकारचे आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहेत. परंतु याबाबतची पुरेशी माहिती नसल्याने बहुतेक जन या योजनांपासून वंचित राहतात. दुसरीकडे काही युवक समाजातील प्रत्येक विधायक कार्याशी जोडलेले असतात. निरपेक्षपणे त्यांचे सामाजिक कार्य चालू असते. असे अनेक‘धडपडे’ स्वयंप्रेरणेने कार्यरत असतात. निरनिराळे उपक्रम आयोजित करणे, विविध उपक्रमांमध्ये कार्यकर्त्याची भूमिका बजावणे यासारखे कार्य युवा कार्यकर्ते स्वत:हून करत असतात.अशा युवकांच्या उर्जेला एका निश्चित प्रवाहात व एका दिशेने प्रवाहित केले गेले तर निश्चितच त्यांच्या प्रयत्नातून एक सकारात्मक वातावरण निर्माण हो…

वसा विवेकानंदांचा

Image
भारतभूमी ही वीरप्रसवा आहे. आजपर्यंत या भूमीत अनेक वीरांनी जन्म घेतला.केवळ भारतालाच नव्हे तर समस्त जगाला आपल्या ज्ञान प्रतिभेने, अतुल्य कर्तृत्वाने आकर्षित केले. समाजजीवनाचा अभिन्न भाग असलेल्या कला,साहित्य,क्रीडा,समाजकार्य,अधात्म,व्यापार-उद्योग अशा सर्वच क्षेत्रातील सर्वोच्च ठिकाणी स्थान प्राप्त केले. अशा भारतभूमीत पश्चिम बंगाल मध्ये जन्म घेतलेल्या एका नरेंद्र नावाच्या मुलाने भारत भूमीला पावन केले. किशोरवयात असतानाच स्वत:मधील अचाट बुद्धीमत्तेचे,एकाग्रतेचे दर्शन अनेक घटनांमधून दाखवले होते. कुतूहल,जिज्ञासा यामुळे ईश्वराच्या अस्तित्वाविषयी जाणून घेण्याची प्रचंड तळमळ नरेंद्राला रामकृष्ण परमहंस या महान व्यक्तीकडे घेऊन गेली. नरेंद्राचा स्वामी विवेकानंद होण्याचा प्रवास या ठिकाणाहून सुरु होतो. ईश्वर आहे का ? असल्यास मला दाखवा असा रोखठोक सवाल करणारा शिष्योत्तम नरेंद्र व त्याच त्वरेने ‘ हो ईश्वर आहे,मी पाहिला आहे व तुलाही दाखवीन’असे ठाम उत्तर देणारे सदगुरू रामकृष्ण परमहंस यांच्यातील गुरु शिष्यांचे नाते ‘गुरु-शिष्य’ नात्यांचे सर्वोत्तम आदर्श आहेत. स्वत: प्राप्त केलेले ज्ञान व त्याची अनुभूती आपल्य…

विज्ञान बुडाले हो ......

एकेकाळी असा समज होता की, ‘ शिक्षित अथवा उच्चशिक्षित व्यक्ती हा प्रगल्भ असतो. जीवन जगण्याची सृजनात्मक दृष्टी त्याच्याकडे असते. समाजातील दु:ख, वेदना याविषयी तो संवेदनशील असतो व आपल्या विरोधी मताचाही तो तितकाच आदर करतो.’ दुर्दैवाने हा समज हळूहळू खोटा ठरत आहे. म्हणजे शिक्षित अथवा उच्चशिक्षित व्यक्ती समाजातील दु:ख,वेदना याविषयी संवेदनशील असेलच असे म्हणता येत नाही. तसेच स्वत:स न पटणा-या मताविषयी तो चर्चेची दारे खुले ठेवेलच असेही खात्रीने सांगता येत नाही. हा प्रकार म्हणजे २१ व्या शतकातीलवैचारिक पातळीवरचे अत्याधुनिक मागासलेपणाचेच लक्षण दर्शवतो. निमित्त आहे मुंबईत होणा-या एका वैज्ञानिक परिषदेचे. इंडियन सायन्स कॉंग्रेस चे १०२ वे अधिवेशन मुंबई येथे ४ जानेवारी पासून सुरु होत आहे.या कार्यक्रमास नामवंत वैज्ञानिक, संशोधक उपस्थित राहणार आहेत. अशा या मंगल प्रसंगी एका चर्चासत्राच्या निमित्ताने हा चर्चेचा धुराळा उडाला आहे. ‘भारताचेऐतिहासिक विमान तंत्रज्ञान’ या विषयावर एक चर्चासत्र आयोजित केले गेले आहे. हा विषयकैप्टेन आनंद बोदासआणिअमेया जाधवमांडणार आहेत. त्यांच्या संशोधनाचा गाभा असा आहे की, ‘भारतातील ऋषी…