Posts

Showing posts from February, 2015

सांस्कृतिक राष्ट्रवादाचा भयगंड

समाजातघडणा-या विविध घटनांचे विश्लेषण प्रत्येक जन आपल्या पध्दतीने करत असतो. लोककल्याणाचे ध्येय समोर ठेवून त्यासंबंधी चिकित्सा करून काही निष्कर्ष मांडणारे विविध विचारप्रवाह कालौघात निर्माण झाले. या प्रत्येक विचारप्रवाहातविकासाच्या स्वत:च्या अशा व्याख्या आहेत. परस्पर विरोधी विचारप्रवाहांच्या मुद्द्यांना तर्काच्या आधारेखोडून काढणारीअथवा प्रामाणिकपणे त्यांना तपासून त्यातील कच्चे दुवे समाजासमोर मांडणारीप्रगल्भ वैचारिक परंपरा भारतात प्रसिद्ध आहे. परंतु हीपरंपरा लोप पावत आहे की काय अशी शंका निर्माण होत आहे. याचे कारण असे की,वैचारिक क्षेत्रातीलकाही प्रस्थापितमंडळीनीआपल्या गैरसोयीच्या व म्हणून न पटना-या वैचारिक संकल्पनांच्या बाबतीत टोकाचा तिरस्कार निर्माण करण्याची कुप्रथा चालू केली आहे.'सांस्कृतिक राष्ट्रवाद' ही अशीच एक वैचारिक संकल्पना आहे की ज्यावर उजव्या विचारसरणी चा शिक्का मारला जात आहे. एकवेळ हा शिक्का मारला गेला की मग ती व्यक्ती,विचार,संस्था यांचे सर्वच निवेदन त्याज्य,अस्पृश्य ठरवले जाते. परस्पर विरोधी मताचा अस्वीकार करत असताना आपली वागणूक ही आपल्या विचारातील संकुचितपणा अथवा व्याप…

राजे आम्हाला माफ करा ….

Image
आम्हाला याची पुर्ण खात्री आहे की, हे शब्द आपल्याला आवडणार नाहीत; परंतु तरीही आपल्यासमोर उभे राहिल्या नंतर खोटे  बोलता येत नाही. रायगडावर चढताना प्रत्येक पाउलावर आपल्या अतुल्य शौर्याची,सामर्थ्याची जाणीव होत होती. कानामध्ये वीर रसाची स्फुर्तीगीते ऐकू येत होती. आपल्या शौर्याची जीवंत साक्षीदार असलेली,  आपल्या पदस्पर्शाने पावन झालेली मातीतून एक वेगळाच दिव्य स्पर्श जाणवत होता.डोळ्यासमोर पराक्रमी योध्यांच्या युद्धप्रसंग सहज दिसू लागत होते. कडे कपारीतून 'हर हर महादेव'  ही गगनभेदी गर्जना घुमत होती. मावळ्यांच्या अतुल्य त्यागाचे,निष्ठेचे प्रसंग ऐकून वारंवार  उर भरून येत होता.मनाच्या अशा अवस्थेत राजे तुमच्या सिंहासनासमोर उभे राहिलो अन आपल्याला मुजरा करताना आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. परंतु लगेचच देदीप्यमान भूतकाळातून अस्वस्थ्य करणारे वर्तमानाचे भान आले तत्क्षणी स्वत:चीच लाज वाटली. वर्तमानातील काळोखाने श्वास गुदमरून गेला. आणि अत्यंत अपराधी भावनेने आपल्या समोर नतमस्तक होऊन अश्रूना वाट मोकळी करून दिली.  आवंढा गिळत बोलण्याचा प्रयत्न करत होतो. शेवटी अडखळत का होईना एकच वाक्य बोलू शकलो &…

विकृत मनोरंजन

Image
स्वातंत्र्य व त्यासोबतच्या असणा-या जबाबदारीच्या संदर्भात मागील लेखातच चर्चा झाली होती. त्यात असेही नमूद केले होते की, स्वातंत्र्याला विवेकाचा आधार नसेल तर त्याचे विकृती बनते. याची प्रचीती यावी अशी घटना नुकतीच घडली. एआयबी रोष्ट अशा नावाच्या शो मध्ये सार्वजनिक सारासार विवेकाचे धिंडवडे निघाले. समाजाच्या एका वर्गात पेज थ्री संस्कृती प्रचलित आहे. त्याचेच सवंग व किळसवाणे प्रदर्शन एआयबी रोष्ट सारख्या कार्यक्रमामधून होत असते. ‘बिग बॉस’ हा सुध्दा असाच एक कार्यक्रम आहे. ‘एआयबी रोष्ट’ हा कार्यक्रम अत्यंत हीन दर्जाच्या विनोदासाठी आयोजित केला जातो. ज्यामध्ये कलाकार अत्यंत भीबत्स प्रकारचे विनोद करतात. विशेष म्हणजे प्रेक्षकात महिला असतानाही, महिलांच्याविषयी अत्यंत किळसवाणे विनोद केले जातात. मनोरंजनाच्या नावाखाली सार्वजनिकरीत्या इतक्या हीन दर्जाचे विनोद करणे केवळ असभ्यपनाचेच नव्हे तर विकृत बुद्धीचे लक्षण आहे. दर्जेदार विनोदी कथा,साहित्य, कार्यक्रम निर्माण करण्याची अथवा ते समजण्याची लायकी नसल्यानेच असल्या प्रकारची घाण तयार होते. मनोरंजन करायचे म्हणून कोणी रस्त्याने नागडा फिरत नाही अथवा वाट्टेल ते बोलत न…

मुसद्दीलाल ची व्यथा संपेल का ?

सब टी.व्ही.वर ऑफीस- ऑफीस नावाची मालिका खूप लोकप्रिय झाली होती. त्यातील मुसद्दीलाल हे पात्र सर्वसामान्य मध्यमवर्गीयाचा प्रतिनिधीत्व करणारे होते. शासकीय कार्यालयात काम करताना एका सामान्य नागरिकाला ज्या अग्निदिव्याला सामोरे जावे लागते त्याचे यथार्थ चित्रण या मालिकेत होते. त्यातील विनोदाचा भाग सोडला तर मुसद्दीलाल चे जगणे ब-याच अंशी प्रत्येक नागरिकाच्या वाट्याला येतेच. कुठलेही काम वेळेवर न करणे, नेमके कुठले कागदपत्र आवश्यक आहेत याबाबत स्पष्ट कल्पना न देणे, लाच दिली तर आवश्यक कागदपत्रे नसली तरी काम होणे,  एकुणात ‘कर्तव्य पार पाडण्याच्या कंटाळा’ हे या यंत्रणेचे व्यवच्छेदक लक्षण बनले आहे. अर्थात सर्वजन दोषी नसतीलही कदाचित परंतु त्यांची संख्या मात्र कमी आहे हे मात्र निश्चित. काम न होण्यासाठी नेमके जबाबदार कोण या प्रश्नाचे उत्तर नेहमीच ‘संकीर्ण’ असते. संकीर्ण हा कार्यालयीन शब्द वेळकाढूपणासाठी परवलीचा आहे. अशा कारभाराने सामान्य जनता मात्र पिचून जाते व कार्यालयाचे खेटे मारणे,लाच दिल्याशिवाय काम न होणे व विशेष म्हणजे अत्यंत हीन दर्जाची वागणूक मिळणे हा त्रासदायक अनुभव प्रस्थापित व्यवस्थेविषयी तिरस्…