Posts

Showing posts from April, 2015

आनंदाची क्रमवारी

Image
जागतिक पातळीवर वेगवेगळ्या मुद्यांच्या अभ्यासासाठी सर्वेक्षण, पाहणी केली जाते. कधी उत्कृष्ट गुणवत्ता असलेली शैक्षणिक संस्था शोधण्यासाठी तर कधी पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी सर्वेक्षण केले जाते. जगातील सर्वाधिक आनंदी देश शोधण्यासाठी जागतिक पातळीवर नुकतेच एक सर्वेक्षण केले गेले. ज्यामध्ये त्या देशातील नागरिकांच्या आनंद व समाधान याबाबतीत पाहणी करून क्रमवारी तयार करण्यात आली. या यादीत भारताचा क्रमांक ११७ वा असल्याचे सांगितले गेले. अर्थात भारतासारख्या बहुरंगी, बहुढंगी व लोकजीवनात पावलापावलावर विविधता आढळणा-या या देशात आनंद व समाधान यासारख्या मानसिक पातळीवरील बाबीसंबंधात काही निवडक लोकांना प्रश्न विचारून संबंध देशाविषयी अनुमान काढणे कितपत व्यवहार्य आहे याबद्दल निश्चितपणे शंका निर्माण होऊ शकतात. खरे पाहता मुळातच या पाहणीचे प्रयोजन फारच गमतीशीर वाटते.

प्रज्ञासूर्याची किरणे

Image
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख-दुःखाचे,मान-सन्मानाचेप्रसंग येत असतात. आपल्या व्यक्तीमत्वाची परीक्षाख-या अर्थाने प्रतिकूल परिस्थितीत होत असते. बहुतेक जन परिस्थितीला दोष देऊन प्रवाहात सामील होतात. काहीजण परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्नास सुरुवात करतात मात्र काही कठीण प्रसंगी धीर खचून हाती घेतलेले कार्य अर्धवट सोडून देतात. मात्र इतिहास असेच व्यक्ती घडवतात की जे कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी त्याचा धैर्याने सामना करत परिस्थितीत अनुकूल बदल घडवून आणतात. अतिप्रचंड सामर्थ्य असलेला काळ फक्त अशाच अतुल्य व्यक्तीमत्वाची दखल घेतो.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एक असेच व्यक्तिमत्व आहे.  

आम्हीही त्याच गावचे

Image
संपूर्ण स्वराज अशी आरोळी देणा-या आंदोलकांनी पारंपारिक आम आदमी च्या नावाने राजकीय पक्ष स्थापन केला. प्रामाणिकपणा, भ्रष्टाचाराविषयी पोटतिडकीने विरोध या मुद्द्यांच्या आधारे राजकारणाला वैतागलेल्या सामान्य जनतेच्या अंतर्मनाचा ठाव घेत नवा पर्याय देत असल्याचा दावा केला. परंतु सध्या ज्या काही घटना घडत आहेत त्यावरून आम आदमी पक्ष हा सुद्धा इतर राजकीय पक्षांसारखाच आहे व स्वत: केजरीवाल हे सुध्दा इतर राजकीय नेत्यांसारखेच आहेत यावर शिक्कामोर्तब होत आहे. प्रत्येक राजकीय पक्षात वर्चस्वाची लढाई असतेच व यामुळे नेत्यांमध्ये अंतर्गत स्पर्धा,कुरघोडी या होतच असतात ही वस्तुस्थिती आहे. केजरीवाल व तत्सम नेत्यांनी नेमक्या याच वस्तुस्थितीला नाकारत इतर राजकीय पक्ष व नेते यांना शिव्याशाप देण्याचा उद्योग चालू केला व आपणच सर्वात प्रामाणिक,त्यागी व म्हणून वेगळे असल्याचा आव आणला. यासाठी त्यांनी अनेक क्लृप्त्या लढवल्या. अंतर्गत लोकपाल सारखे पद निर्माण केले, वेबसाईट वर जमा खर्चाचा तपशील जाहीर केला. ही कार्य पध्दती आदर्श स्वरूपाची असली तरीही जेव्हा याच पध्दती मुळे केजरीवाल यांच्या नेतृत्वाला आव्हान मिळू लागले तेव्हा हीच…