प्रज्ञासूर्याची किरणे - दर्पण

Sunday, April 12, 2015

प्रज्ञासूर्याची किरणे

प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख-दुःखाचे,मान-सन्मानाचे  प्रसंग येत असतातआपल्या व्यक्तीमत्वाची परीक्षा  -या अर्थाने प्रतिकूल परिस्थितीत होत असतेबहुतेक जन परिस्थितीला दोष देऊन प्रवाहात सामील होतातकाहीजण परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्नास सुरुवात करतात मात्र काही कठीण प्रसंगी धीर खचून हाती घेतलेले कार्य अर्धवट सोडून देतातमात्र इतिहास असेच व्यक्ती घडवतात की जे कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी त्याचा धैर्याने सामना करत परिस्थितीत अनुकूल बदल घडवून आणतातअतिप्रचंड सामर्थ्य असलेला काळ फक्त अशाच अतुल्य व्यक्तीमत्वाची दखल घेतो.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एक असेच व्यक्तिमत्व आहे.  
१८ तास अभ्यास करण्याची शिकवण ही डॉ.आंबेडकरांच्या जीवनातील सर्वात मोठी प्रेरणा आहेया एकाच शिकवणीतून प्रेरणा घेऊन दृढ संकल्प केल्यास कुठलाही युवक यशापासून दूर राहणार नाही याची खात्री  मिळतेगरज आहे ती संकल्पशक्ती ची व प्रथम स्वतत बदल घडवून आणण्याचा निर्धार करण्याचीडॉ.आंबेडकर यांचे ग्रंथप्रेम तर अतुलनीय असेच होतेआजच्या तरुणाईने  यापासून प्रेरणा घेऊन आपल्या व्यक्तिगत खर्चाचा किमान काही भाग तरी ग्रंथासाठी राखून ठेवावा व त्यांचे नियमित वाचन करावेज्याक्षणी वाचनाचे वेड लागेल त्याक्षणी व्यर्थ वाया जाणारा वेळ व त्यामुळे व्यसनाकडे वळणारी तरुणाई स्वत:च्या विकासाकडे एक पाऊल अग्रेसर होईलवाचनाने प्रेरणा मिळत जाईल व वैचारिक प्रगल्भतेमुळे आयुष्यात सकारात्मक बदल घडतीलयाकरिता असे म्हणावेसे वाटते कीप्रत्येक व्यक्तीच्या घरात असणारा ग्रंथसंग्रह ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली ख-या अर्थाने श्रद्धांजली आहे.
ज्या काळात मानवाना घृणास्पद वागणूक दिली जात होतीदूर दूरपर्यंत त्यांच्या कल्याणाचा विचार करणारे कोणीही नव्हते त्या काळात  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कर्तृत्वाने प्रतिकूल परिस्थितीशी झगडत सामाजिक बदलाची क्रांती निर्माण केलीत्यांच्या चरित्रातून सर्वात महत्वाचा संदेश मिळतो तो असा कीअत्यंत प्रतिकूल परिस्थिती असली तरी त्याबद्दल कुढत न बसता ती बदलण्यासाठी प्रत्यक्ष कार्यास सुरुवात केली पाहिजेम्हणजेच काळाकुट्ट अंधार असताना त्याच्या भयाणतेविषयी बोलत बसण्यापेक्षा दिवा पेटवून तो अंधार दूर करण्याचा प्रयत्न करावा.       
अंधाराच्या भयाणतेविषयी बोलत बसल्याने अंधार दूर होणार नाहीहे लिहिण्याचे कारण असे कीवर्तमानातील बहुतेकजण केवळ असाच व्यवहार करतातअंधकाराचे अस्तित्व आजही आपले डोके वर काढतच आहेअज्ञानव्यसने या आधारानी अंधकार उजेडाच्या सत्तॆला आव्हान देतच आहेभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रज्ञासूर्यानी स्वत:च्या अस्तित्वाने दीनदलितांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निर्माण केलेला उजेड आपण सार्थकी लावायला हवात्यांच्या परिश्रमाचे चीज व्हावे असे वाटत असेल त्या प्रत्येकाने दिवा पेटवून अज्ञानव्यसने यांचा अंधार दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजेअनेकजण स्वत:ची आर्थिक ,सामाजिक प्रगती झाली की त्यांना आपल्या समाजबांधवांचा विसर पडतो. त्यांच्यातील कृतज्ञतेची भावना विरून जाते. परंतु याला अपवाद म्हणजे दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अंड इंडस्ट्रीज (डिक्की) या संघटनेची निर्मिती करणारे श्रीमिलिंद  कांबळे यांचे प्रकर्षाने स्मरण होतेमिलिंदजी नी स्वतएका उद्योग समूहाची निर्मिती केली व देशातील दलित समाजातील उद्योजकांना एकत्र करून 'डिक्कीया संघटनेची उभारणी केलीया संघटनेच्या माध्यमातून त्यांनी दलितबांधवांच्या उत्थानासाठी अनेक विधायक उपक्रम सुरु केले आहेत.  समाजाचे ऋण फेडणारे श्रीमिलिंद  कांबळे यांचे कार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर या प्रज्ञासूर्याची किरणे आहेत यात शंका नाही
स्वत:वर अथवा आपल्या बांधवांवर झालेल्या अन्यायाने मनामध्ये विद्रोह  निर्माण होणे अगदीच साहजिक आहे. परंतु या विद्रोहाच्या उर्जेचे सकारात्मक, विधायक शक्तीत रुपांतर करून परिस्थिती बदलणे आव्हानात्मक असते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानतेची  प्रचिती या ठिकाणी मिळते. सामान्यात: बहुतेकजण विद्रोहशक्तीचे रुपांतर विधायक उर्जेत करण्यात यशस्वी होत नाहीत व परिणामी विद्रोहाच्या शक्तीला नकारात्मक वळण लागले की त्याने कुठलेही सृजनात्मक व पर्यायाने कालजयी असणारे कार्य निर्माण होत नाही.          
माणसाने-माणसाशी वागत असताना हृदयात करुणा जोपासली पाहिजे  व त्याहीपुढे जाऊन या करुणेपोटी त्या जीवाच्या वेदना दूर करण्यासाठी आपले हात पुढे सरसावले पाहिजे या संदेशाचा आदर्श वस्तुपाठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरीत्रातून मिळतो. ‘मी व माझे’ हे वर्तुळ विस्तारले पाहिजेस्वत:ची आर्थिक प्रगती झाली की जबाबदारी संपली असे न करता समाजात अजूनही शोषित असलेल्यांच्या आर्थिकसामाजिक व वैचारिक प्रगती साठी स्वत:चे योगदान दिले पाहिजे ही महत्वाची शिकवण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरीत्रातून मिळते.
समाजातील सर्व जातीभेद, विषमता नष्ट करण्यासाठी स्वत:च्या आयुष्यातील प्रत्येक क्षण कार्यरत असणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे येणा-या अनेक पिढ्यांसाठी अखंड प्रेरणास्थान आहेत. या प्रज्ञासूर्याची किरणे होण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्यामुळे समाजातील  जातीभेद, विषमता, अज्ञान, व्यसने,शोषण यांचा अंधकार दूर होऊ शकेल  व  -या अर्थाने डॉबाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पुर्ण होईल.  

No comments: