Posts

Showing posts from March, 2017

मेरी मर्जी…

Image
देशातील अभिव्यक्तिस्वातंत्र्याची चर्चा ऐकल्यावर हिंदी चित्रपटसृष्टीतील एक गाणे आठवले. अभिनेता गोविंदा याच्यावर चित्रित केलेल्या या गाण्याचे बोल आहेत ‘मेरी मर्जी. मै चाहे ये करू, मै चाहे वो करू, मुझे कोई रोके नही मुझे कोई टोके नही.’ म्हणजे मी वाट्टेल तसे बोलणार, वाट्टेल तसे वागणार मला कुणीही अडवू नये. माझ्या वागण्याचा काहीही दुष्परिणाम होवो मला त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही. साधारणपणे अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे हेच आहे असा समज सर्वत्र पसरला आहे. ज्या देशात तक्षशिला, नालंदासारखी विद्यापीठे होती, तेथील विद्यापीठे ही उच्च शैक्षणिक गुणवत्तायुक्त असावयास हवी. या ठिकाणी जगभरातील चिकित्सकांनी, अभ्यासकांनी येथे येऊन ज्ञान संपादन करावे. मानवी समाजजीवनाला व्यापणार्‍या विविध शास्त्रांतून संशोधन व्हावे. जगाच्या कल्याणासाठी त्याचा उपयोग व्हावा. मात्र सध्याची परिस्थिती पाहता हे केवळ स्वप्नरंजन ठरावे असेच चित्र आहे. भारतातील विद्यापीठे गाजताहेत ती अभिव्यक्तिस्वातंत्र्य, आझादी, बरबादी घोषणाबाजीने. ज्या ठिकाणी शास्त्रार्थ चर्चा, खंडन-मंडन, संवाद व्हावेत त्या ठिकाणी कथित आझादीचा कर्कश आवाज ऐकू येत …