Posts

Showing posts from April, 2017

जबाबदारी कोणाची ?

Image
व्यक्तिगत जीवनात, समाजात,राष्ट्रात अथवा जगाच्या पाठीवर कोठेही एखादी बरीवाईट घटना घडली की त्याला जबाबदार कोण याविषयीची कारणमीमांसा सुरु होते. अर्थात ती व्हायलाच हवी. परंतु प्रश्न आहे तो जबाबदारी स्वीकारण्याचा आणि जबाबदारी ढकलण्याचा. समाजातील सर्व नागरिकांना रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य यांसारख्या मुलभूत सोयीसुविधा पुरवणे, सुरक्षेची हमी व सामाजिक व आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेले वातावरण उपलब्ध करणे हे शासनव्यवस्थेचे कर्तव्यच आहे. त्याविषयीच्या बऱ्यावाईट घटनांबद्दल शासनव्यवस्थेस जबाबदार धरलेच पाहिजेत. मात्र प्रश्न जेव्हा समाजातील अनिष्ट प्रथा, परंपरा चालीरीती बाबत असतो तेव्हा त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनव्यवस्थेवर ढकलून स्वत: जबाबदारीतून मुक्त होण्याची प्रवृत्ती प्रश्नांपासून पळ काढणारी आहे. लातूर येथील शीतल वायाळ च्या दुर्दैवी आत्महत्येने हुंडा समस्या अजूनही प्रबळ असल्याचे दिसून आले आहे. समाजातील अनिष्ट चालीरीती, प्रथा नष्ट करण्यासाठी शासनव्यवस्था कायदे  करीलही  परंतु जोपर्यंत समाजातील व्यक्ती हा बदल मनापासून स्वीकार करत नाहीत तोपर्यंत त्या संपूर्णपणे होऊ शकत नाहीत. …