Posts

Showing posts from April, 2018

बलात्काऱ्याना फाशीच हवी; पण मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणे केव्हा बंद होणार ?

Image
असिफा च्या बाबतीत अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. कोणाही संवेदना जाग्या असलेल्या व्यक्तीचा थरकाप उडवणारी ही घटना आहे. म्हणून यात जे कोणी दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. मात्र यानिमित्ताने तिच्या दुर्दैवाचे भांडवल करून राजकारणाचा, धार्मिक विद्वेषाचा व्यवसाय मात्र जोरात चालला.                                    (इंटरनेट सौजन्य) महत्वाचा मुद्दा असा की, आजपर्यंत पीडीतेचे नाव माध्यमात येत नव्हते. मात्र असिफा या देशातील अल्पसंख समाजाचे प्रतिनिधित्व करते आणि आरोपी हा बहुसंख्य समाजातील असल्याने एका धर्माच्या माध्यमातून आरोपीच्या धर्माला शिव्या द्यायची दुर्मिळ संधी ढोंगी सेक्युलरवाद्यांनी अजिबात दवडली नाही. म्हणजे असिफा साठी असणारे दु:ख यापेक्षा हिंदूना झोडपायची भावना अधिक प्रभावी दिसत आहे. असिफावर झालेल्या अत्याचाराचे भांडवल करून हिंदू धर्माविरोधात वातावरण तापवण्याचा अत्यंत घृणास्पद प्रकार सर्रास होताना दिसत आहे. खरे पाहता ज्या नराधमाने अत्याचार केलेत त्याचे कुठलाही हिंदू कोणत्याही परिस्थितीत समर्थन करणार नाही आणि जर असे कोणी करत असेल तर ती हिंदुच काय माणूस म्हणूनही दावा करू शकत ना…