Posts

Showing posts from January, 2019

ठाकरे चित्रपट अन दोन प्रेक्षकांची गुफ्तगू .....

Image
ठाकरे चित्रपट अन दोन प्रेक्षकांची गुफ्तगू ..... देशाच्या व विशेषत: राज्याच्या राजकारणात धृवपदी असलेल्या हिंदूहृदय सम्राट यांच्या जीवनावरील  प्रदर्शित झाला अन दोन दिग्गज प्रेक्षकांमधला संवाद दस्तुरखुद्दांच्या कानी पडला. फोनची बेल वाजली (तुतारीचा आवाज) होता. बेल ऐकून क्षणभर छान वाटले अन रिसीव्ह केला. पलिकडून : (‘जय महाराष्ट्र’ असे मनातल्या मनात म्हणून) कुठे आहात सध्या ? असे बोलणे एका कोकणस्थ व्यक्तीस लगेच कळते त्यामुळे अत्यंत क्रोधाविष्ट होऊन (वास्तविक चवताळून) त्यांनी प्रतिप्रश्न केला. कोकणचो माणूस : सिंच्या, माका इचारणारा तू कोण हैस ? मी कोणत्याही पक्षात जाईन. (समजावणीच्या सुरात) साहेब माझ्या बाहुतील बळ कमी झाले म्हणून माझा नंबर पण सेव्ह नाही  केला तुमी ? हे बरोबर नाही. आणि तुमी मुंबईत आहेत का अस विचारलं ? कोकणचो माणूस :  तुमी असा व्हय. बोला की मग. काय काम काढले ? एक गोष्ट अगोदरच सांगतो मी तुमच्या आघाडीत येऊ शकत नाय. पलीकडून : ते जाउद्या हो. अगोदर एक सांगा पिक्चर पाह्यला का ? (ते बहुधा निवृतीच्या विचार करत असून आपल्यालाही तसाच सल्ला देत आहेत असे समजून टिपिकल स्टाईल मंधे ) कोकणचो माणूस : आता पिक्चर…

डिजिटल आणीबाणी आणि धन्नोभौ

Image
(धन्नोभौ आपल्या कार्यालयात येरझाऱ्या घालत असताना आणीबाणी, निषेध अस काहीतरी पुटपुटत असतात ) तेवढ्यात बुवा हातात डायरी घेऊन धा वाजून धा मिनिटाला प्रवेशते झाले. बुवा : साहेब घात झाला, घात झाला शांत होण्याचा निर्धार करत असतानाच जोशीबुवांच्या घातवाणी कडे साहेबानी गरकन मान वळवत बघितले   धन्नोभौ : बुवा, अस आभाळ पडल्यासारखे काय ओरडता, (प्र)शांत व्हा. नीट सांगा काय झाले ते. बुवा : जुलमी सरकारने माझे व्हॉटस अप बंद केले. धन्नोभौ  : काय .... व्हॉटस अप बंद केले.  वाटलेच मला. सर्वत्र आणीबाणीसारखे वातावरण असताना व्हॉटस अप कसे चालू . त्रिवार निषेध. बुवा तातडीने पत्रकारांना बोलवा. बुवा : (आणखीनच अस्वस्थ होत) साहेब त्यामुळे तर आणीबाणी लागली. धन्नोभौ : म्हणजे ? बुवा : इरोधी पक्षनेत्यांचा पत्रकारांशी संपर्क वाढल्याने सरकारने हे कुटील कारस्थान केल असेल धन्नोभौ : काय SSS ? मग तर डिजिटल आणीबाणी लागू झाल्याचे जाहिर करा. आत्ताच्या आत्ता.   बुवा : साहेब एकवेळ तंत्रकुशल मदतनीसास दाखवू का ? धन्नोभौ : त्याची काही गरज नाही. तो पण सरकारच्या या कटात सामील असू शकतो. बुवा : पण मी काय म्हणतो. धन्नोभौ : आपण विरोधात आहोत. संशय घेणे आप…