Posts

Showing posts from February, 2019

भारत पुरुषार्थ विसरलेला आहे यावर ठाम विश्वास असलेला पाकिस्तान

Image
विविध माध्यमातून नित्य कुरापती काढणारे, चार युद्धे हरुनही खुमखुमी कायम असणारे कांगावाखोर राष्ट्र अन सर्वात महत्वाचे म्हणजे भिकेकंगाल असूनही काश्मिरात फुटीरतावादी चळवळीना प्रोत्साहन देणारे अपयशी राष्ट्र असणाऱ्या पाकिस्तानसारख्या डोकेदुखीने आतापार्यात हजारो जवानांचा बळी घेतला. स्थानिक पोलिसांवर, अर्धसैनिक बलावर सहजतेने दगडफेक करून जखमी केले जाते. अशा प्रकारचे गुन्हे करण्याची हिम्मत येते कुठून ? भारताजवळ अनलिमिटेड माणुसकी तर आहेच शिवाय भारत पुरुषार्थही विसरलेला आहे यावर पाकिस्तानचा ठाम विश्वास असल्याने पाकिस्तानकडून अशा प्रकारचे कार्य बिनबोभाट केले जाते. तीव्र शब्दात निषेध यापलीकडे भारताकडून काहीही होणार नाही यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. अन्यथा हातात बंदुका असलेल्याजवानावर शेकडोंचा जमाव हातात दगड घेऊन चाल करण्याच्या घटनाना प्रोत्साहन देणे पाकिस्तानला कधीही शक्य झाले नसते.

शास्त्र आणि शस्त्र हाच भारताचा पुरुषार्थ याच भारतभूमीवर अन्याय, अत्याचाराला संपवण्यासाठी हातात शस्त्रे घेऊन युद्धे झाली आहेत. त्यात सत्य,सदाचार व नैतिक मूल्यांचा विजय झाला आहे. किबहुना त्यांच्या रक्षणासाठीच तत्कालीन योध्…

शकुनीचे असिस्टंट.....

Image
स्थळ : बहुधा ठाणे असेल...
वेळ : अत्यंत निर्वाणीची
(घडाळ्यातील काटे मंद आवाज करत असताना मध्येच हमसून हमसून कारुण्य रसातील आवाज दस्तुरखुद्दांच्या कर्णी पडला.)
आता पीडितांचे दु:ख दूर करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे असे आम्ही समजतो. म्हणून जरा कानोसा घेतला असता ते परिस्थिती भयंकर कठीण वाटली. जणू काही एका जितेंद्रिय व्यक्तीला कुणी तरी हाड हाड म्हणून हेटाळणी केल्याचा भाव वातावरणात दरवळत होता.
टेबलावर डोके ठेवून एक नेते (स्टार्च चे पांढरेशुभ्र कपडे ) हमसून हमसून रडत होते. मोबाईल मध्ये महाभारत सिरीयल चे थीम सॉंग लावले होते.
दस्तुरखुद्द : सायेब , आत येऊ का ?
सायेब : (आवंढा गिळून) कशाला ?
दस्तुरखुद्द : आपले दु:ख जाणून घेईन म्हणतो.
( स्वतःस सावरत सायेब बोलले )
सायेब : आमच्या सायेबाला त्या शकुनी म्हणाल्या. 
दस्तुरखुद्द : (महाभारतातील श्रीकुष्ण जसे पार्थाला म्हणाले तशा भावात) त्याच्यात काय एवढे दु:ख करण्यासारखे आहे ?
सायेब : आमचे सायेब काय शकुनी आहेत काय ?
(म्हणजे त्यापेक्षा भयंकर आहेत की काय अशी शंका आली) . दस्तुरखुद्द : म्हणजे ?
सायेब : आमच्या सायेबानी खूप मोठ्ठे कार्य केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाख…