Posts

Showing posts from July, 2019

सत्तावादी पक्षाची वाताहत...

Image
महाराष्ट्र, राजकारण आणि सत्ताकेंद्र अशा तीनही शब्दांना एकच समानार्थी शब्द म्हणजे शरद पवार. सत्ता कोणाचीही असो सत्तेचे वलय या नावापासून कधीही वेगळे झाले नाही. राज्यात अन केंद्रातही ज्यांचा शब्दाला कायम वजन होते असे नाव म्हणजे शरद पवार. वसंतदादाकडून सत्ता मिळवण्याची घाई असो किंवा तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी नावाने नवीन पक्षाची स्थापना अन पुन्हा सत्ताप्राप्तीसाठी कॉंग्रेसच्या सरकारमध्ये मंत्रीपद स्वीकारणे असो प्रत्येकवेळी सत्ताप्राप्ती हेच एकमेव ध्येय दिसून आले. सत्ता असो वा नसो शरद पवार या नावाभोवती सत्तेचे वलय कायम राहिले. मात्र कायम सत्तेत राहण्याच्या महत्वकांक्षेने मोठे वलय निर्माण केलेल्या या नावाभोवती सत्ताप्राप्तीचे भुकेले गोळा झाले. आणि अर्थातच जोपर्यंत सत्ता होती तोपर्यंत ही भुकेली मंडळी पवार साहेंबांसोबत होती अन सत्ता दूर होताना दिसताच ही मंडळी आपली भूक भागवण्यासाठी नवीन ताट शोधायला बाहेर पडली आहे. म्हणजे ज्या पद्धतीने सत्ताप्राप्ती साठी शरद पवार साहेबानी वेळोवेळी भूमिका बदलली त्याच पध्दतीने त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या…