Posts

Showing posts from December, 2019

गिधाडानो आणखी किती लचके तोडाल ?

Image
प्रत्येक प्राणीमात्राला पोटाची आग शमवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. निसर्गाची अन्नसाखळी कार्यरत असते. काही प्राण्यांना जीवंत राहण्यासाठी इतर प्राण्यांच्या हाड-मासावर अवलंबून रहावे लागते. जसे की, गिधाडे. ही गिधाडे प्राण्यांचे मांस खाऊन आपला उदरनिर्वाह करतात. अनेकवेळा ही गिधाडे मेलेल्या किंवा अर्धमेलेल्या प्राण्याच्या शरीराचे लचके तोडण्यासही धजावतात. त्याच्या या कृतीबद्दल गिधाडांना कणमात्रही दोष देता कामा नये, कारण ती त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. वाईट याचे वाटते की, मनुष्य प्राण्यात सुध्दा ही गिधाडी वृत्ती वेगाने फोफावत आहे. खरे पाहता मानवाला जीवंत राहण्यासाठी कोणाही व्यक्तीच्या शरीराचे लचके तोडण्याची आवश्यकता नाही. परंतु तरीही केवळ क्षणभंगुर सत्ता अथवा आर्थिक उन्नती साठी मानवातील ही गिधाडे राष्ट्रहिताचे लचके तोडू पाहत आहे. अर्थात राष्ट्रहिताचे लचके तोडण्याची ही काही पहिलीच वेळ आहे असे नव्हे. इतिहास साक्षी आहे जेव्हा जेव्हा राष्ट्रहिताला बाधा पोहोचली तेव्हा तेव्हा या गिधाडांनी लचके तोडून आपले पोट भरले आहे. नागरिकता संशोधन विधेयक नुकतेच संसदेच्या दोन्ही सभागृहात संमतहोऊन त्याचे कायद्य…