Posts

Showing posts from January, 2020

आम्ही सारे नालायक..

Image
आता आपले काही खरे नाही. आपल्याला देशातून हाकलवून लावणार, नाहीतर जेलमध्ये टाकणार त्यामुळे आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करून रस्त्यावर उतरा.    अत्यंत आवेशपूर्ण भाषणात असे विषारी वाक्य कानावर पडते अन एक समुदाय रस्त्यावर उतरतो, बंद पुकारतो, तोडफोड करतो. सरतेशेवटी महिला व बालकांना पुढे करून रस्ते बंद केले जातात. हे आहे २०२० मधील भारताचे चित्र. ज्या डॉ.अब्दूल कलामांनी २०२० साली भारत विकसित देश होईल असे स्वप्न बघितले त्याच देशातील २०२० चा पहिला महिण्यातील चित्र असे आहे. एखाद्या विषयावर चुकीचा मतप्रवाह बनवून वातावरण अस्थिर करणे किती सहजसाध्य आहे भारतात. नागरिकता संशोधन कायदा हे त्याचे ताजे उदाहरण. झोपलेल्याला जागे करता येते, परंतु झोपेचे सोंग ज्याने घेतले आहे त्याला जागे करता येत नाही. लाजिरवाणी बाब ही आहे की, आपण सर्व सुशिक्षित, सुसंस्कृत, आधुनिक विचाराचे, उदारमतवादी म्हणवतो. पाकिस्तान,बांगलादेश व अफगाणिस्तान या तीन देशातील अल्पसंख्य नागरिकांना नागरिकत्व देण्यासाठीच्या विधेयकाविरोधात गदारोळ चालू आहे. जे विधेयक स्वातंत्र्यकाळापासून प्रलंबित आहे. त्यावर अनेकदा चर्चा झा…

भिक्षा माई....

Image
भिक्षा माई....
का कुणास ठाऊक पण एरवी सहज वाटणाऱ्या या आवाजामध्ये आज एक विशेष आकर्षण जाणवले अन कुतूहलापोटी बाहेर जाऊन बघतो तर डोक्यावर फडके बांधलेले एक साधूबाबा होते. त्यांना बघून  अंत:करणात शांतता निर्माण झाली. संसारी धावपळीने शीण गेल्यासारखा वाटला. बाबा, ओ, बाबा   (माझ्या आवाजाने त्यांची तंद्री तुटल्यासारखे वाटले.)   अत्यंत आल्हाददायक नजरेने कटाक्ष टाकत माझ्याकडे बघून हसले.  मी विचारले कुठले हो बाबा तुम्ही ? (अत्यंत गंभीर हास्य वदन करत) या प्रश्नानेच तर हैराण झालोय रे.... (मला काहीच समजेना) म्हणजे हो बाबा ? बाबा निघणार इतक्यात मी त्यांना बसण्याची विनवणी केली.   बाबा ओट्यावर बसले अन बोलू लागले   मी तर साधू-फकीर आहे रे, आम्हाला घर-दार बांधून जमत नाही. आम्ही आपले फिरत राहतो. लोकांना चार भल्या गोष्टी सांगतो. काही लोकांना आवडत तर काहीना नाही आवडत. बाबांचे शब्द कारंजाच्या तुषाराप्रमाणे अंगावर पडत होते. आम्ही हे असे असतो. (फाटके कपडे, हातात झोळी कडे दाखवून बाबा सांगु लागले) जन्मे न कोणी, मरे न कोणी, हा सर्व मायेचा खेळ नीतीन वागा, जास्तीची हाव करू नका, अडकू नका कशात ? नका दुखवू कोणाला त्या एका मालिकची आठवण ठे…