काकासाहेब राज्यातील स्थिती बाबत अगोदरच चिंतातुर होते. टीव्ही वर वृत्त बघत असतानाच
एक जाहिरात आली.
अमिताभ बच्चन यांची जाहिरात गुजरात पर्यटन विभागाची जाहिरात चालू होती.
आईए कुछ दिन तो गुजारो गुजरात में ....
अडचणीतून सुटण्यासाठी नियतीने हा दिलेला कौल आहे
असे समजून काकासाहेब थेट उठले अन गाडीत जाऊन बसले. सोबतीला प्रफुल्ल वदनाचे भाई
होतेच.
गाडी थेट गुजरात मधील एका रम्य परंतु अतिशय गुप्त ठिकाणी पोहोचली.
काकासाहेब अन प्रफुल्ल वदनी गाडीतुन उतरून थेट एका कक्षाबाहेर पोहोचले.
महाराष्ट्रातून आलेली गाडी बघितल्यावर सुरक्षारक्षकाने गुप्त कॅमेरा, पेन ड्राईव्ह नसेल ना अशी उगाचच शंका घेतली. पण दोघांनी बनावट हास्य करून कक्षात प्रवेश केला. (घडाळ्यात दहा वाजून दहा मिनिटे झाली होती.)
समोर साक्षात मोटाभाई बसले होते. त्यांनी कुत्सितपणे हास्य करत आमचे स्वागत केले.
मोटाभाई : केम छो साब
काकासाहेब : अं... (विचाराच्या गुंगीतून एकदम बाहेर येत ) मस्त छो , मस्त छो ।
मोटाभाई : कस काय येण केलेत.
(मोटाभाई एकदम मराठीत बोलू लागल्याने काका थोडं सहज झाले . )
काकासाहेब : त्याच काय आहे न.....
मोटाभाई : काय म्हणतेय तुमचे सरकार
(मोटाभाईने मध्येच बोलणे तोंडात अत्यंत खोचक प्रश्न विचारला.)
त्यावर काकासाहेब अत्यंत वैतागलेल्या स्वरात बोलू लागले...
काकासाहेब : तेच तर न. कसलं काय नी कसल काय ?
(मोटाभाई ने अत्यंत अजाणतेपणाचा आव आणून प्रश्न केला)
मोटाभाई : म्हणजे ?
काकासाहेब : कोण कशाला जबाबदार आहे तेच कळेना ? मी कशा कशाला जबाबदार राहू ?
गाडी कोणाची ? घर कोणाचे ? टार्गेट कोणाला ? अन ते ज्वलंत चे बोरूबहाद्दर वर मलाच
अध्यक्ष व्हा म्हणतात. कितीजणाला सांभाळू मी. त्याला हजारदा बजावला गप राहा म्हणून.
पण तो काय ऐकत नाही.
मोटाभाई : ते गृह म्हणजे घर आणि त्याचे कारभारी तर तुमचेच ना . मग असं कस म्हणता ?
(काका अत्यंत सावध झाले)
प्रफुल्ल वदनातून एक गुजराती शब्द कमळ बाहेर पडले : सर, चालो फरी सुरू करिये
गुजरातीतून गुगली आल्यावर मोटाभाई थोडे भावुक झाले.
मोटाभाई : मुझे सूचना पडेगा । पिछली बार आपने ठीक नही किया ।
(काकासाहेब अत्यंत अवघडपणे हसून म्हणाले )
काकासाहेब : अब की बार तुम्ही च जबाबदार. तुम्ही म्हणाल तस करू.
मोटाभाई : त्यांनाही तुम्ही असंच म्हणाला नाहीत ना ?
एकदम हास्यकल्लोळ झाला.
काकासाहेब : वा वा. विनोदबुद्धी आवडली हां तुमची.
मोटाभाईनी कळवतो अस सांगितल्यावर बैठक आटोपली.
महाराष्ट्रात परतत असताना गाडीत काकासाहेबांनी गुप्तता पाळण्याची सूचना केली खरी पण
प्रफुल्ल वदनाने केली खरी परंतु अखेर व्हायचे तेच झाले. मीडिया ची माशी शिंकलीच. परंतु
काकांनीही काळजी घेतलीय. काका म्हणतात मी तर अमिताभ बच्चन यांची जाहिरात पाहून
गुजरात मध्ये गेलो होतो.
No comments:
Post a Comment