लोकशाहीच्या चौथा स्तंभाला लागलेली कीड - दर्पण

Wednesday, June 16, 2021

लोकशाहीच्या चौथा स्तंभाला लागलेली कीड

यापुढील काळात पत्रकारिता हा व्यवसाय नसून व्रत आहे हे  वाक्य विनोद म्हणून सांगितला जाईल. 

याचे कारण म्हणजे लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला काही पुर्वग्रहदूषित लोकांची लागलेली कीड. हा पूर्वग्रह म्हणजे नरेंद्र मोदी सरकार हे मुस्लिमांचे शत्रू आहेत अन त्यामुळे या देशात मुस्लिम समाजावर सातत्याने अत्याचारच होणार. 

हा  पुर्वग्रह सिध्द करण्यासाठी मग देशात अल्पसंख्य समाजाच्या व्यक्तीबद्दल कुठेही काही घडले तर त्याचा थेट संबंध केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारशी जोडायचा अन त्यातून नरेंद्र मोदी कसे मुस्लिमांचे शत्रू आहेत हे कर्कश्श आवाजात ओरडून सांगायचे. 

ताजे उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशातील एका मुस्लिम समाजातील व्यक्तीला मारहाण होउन बळजबरीने जय श्रीराम म्हणण्याचा आग्रह केल्याचे वृत्त वायरल झाले अन लगोलग वायर नावाच्या वृत्त वेबसाईटने ते घटनेची शहानिशा न करताच प्रसारित केले. घटनेबाबतचे वृत्त निराधार असल्याचे समोर आले न वायर विरोधात खोटी बातमी प्रसारित केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला. त्यानंतर वायर ने सावध पवित्रा घेत ते वृत्त दुसऱ्या एका वृत्ताच्या आधारे दिल्याची मखलाशी केली गेली. 

वायर वरील मजकूर आपण बघितलात तर लक्षात येइल की, जवळपास सर्वच मजकुराचा उद्देश नरेंद्र मोदींचे सरकार हे मुस्लिमांचे शत्रू आहे हेच सिद्ध करण्याचा असतो. पण वायरची अडचण अशी की, नरेंद्र मोदी सरकारला मुस्लिमांचे शत्रू सिध्द करण्यासाठी फार काही ठोस हाती लागत नाही. म्हणजे 

शासनाच्या सर्वच योजनांचा लाभ अल्पसंख्य समाज घेत आहे. किंबहुना अल्पसंख्य समाजासाठी विशेष योजना राबवल्या जात आहेत. 

मुस्लिम समाजाचा व्यक्ती म्हणून शैक्षणिक, धार्मिक, आर्थिक विकास, राजकीय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क डावलला जात नाही. 

परंतु आम्हाला वाट्टेल ते बोलुद्या, लिहुद्या. आम्ही कोणासही बांधील नाही ही जर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची 
व्याख्या समजली जात असेल तर तो सुद्धा नरेंद्र मोदी म्हणजे मुस्लिमांचे, लोकशाहीचे शत्रू हे सिद्ध करण्याचा अभ्यासक्रमाचा एक भाग आहे. 

पण या सर्व प्रकारात वाईट याचे वाटते की, नरेंद्र मोदी हे मुस्लिमांचे शत्रू आहेत हे सिद्ध करताना वायर सारखे पूर्वग्रहदूषित कंपनी प्रसारमाध्यमाचा गैरवापर करत असुन त्यामुळे प्रसारमाध्यम हे प्रबोधन करण्याऐवजी सामाजिक विद्वेष पसरवण्याचे काम करत आहे. 

एका अर्थाने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला लागलेली ही कीड आहे. आणि म्हणून हे सत्य जेवढ्या लवकर जनतेला समजेल तेवढ्या लवकर हा स्तंभ निरोगी राहील. No comments: